IPL 2022 Playoffs Scenario after Punjab vs Delhi: दिल्लीकडून सपाटून मार खाल्ल्याने पंजाब किंग्ज स्पर्धेतून बाद झालं का? पाहा PlayOffs चं गणित काय सांगतं...

पंजाबचे १३ सामन्यात १२ गुण, दिल्ली-बंगलोरचा प्रत्येकी १ सामना शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:26 AM2022-05-17T00:26:26+5:302022-05-17T00:27:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Playoffs Scenario for Punjab Kings after Delhi Capitals handed them measurable defeat | IPL 2022 Playoffs Scenario after Punjab vs Delhi: दिल्लीकडून सपाटून मार खाल्ल्याने पंजाब किंग्ज स्पर्धेतून बाद झालं का? पाहा PlayOffs चं गणित काय सांगतं...

IPL 2022 Playoffs Scenario after Punjab vs Delhi: दिल्लीकडून सपाटून मार खाल्ल्याने पंजाब किंग्ज स्पर्धेतून बाद झालं का? पाहा PlayOffs चं गणित काय सांगतं...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Playoffs Scenario, Punjab Kings vs Delhi Capitals : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या ४ बळींच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १७ धावांनी पराभव केला. पंजाबच्या मधल्या फळीचा डाव पत्त्यांप्रमाणे कोसळला. पण पंजाबच्या जितेश शर्माने ४४ धावा करत संघाला काही काळ सामन्यात ठेवले. अखेर त्याचे प्रयत्नही तोकडे पडल्याने पंजाबला १७ धावांनी पराभूत व्हावं लागलं. पंजाबला सपाटून मार दिल्यानंतर दिल्लीच्या संघाने १४ गुणांसह टॉप-४ मध्ये प्रवेश केला तर पंजाब सातव्या स्थानी फेकला गेला. आता दिल्लीचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सशी तर पंजाबचा शेवटचा सामना हैदराबादशी होणार आहे. त्या आधारावर पाहूया PlayOffs चं गणित.

दिल्लीसाठी प्ले-ऑफ्सचं गणित एकदम सोपं

दिल्लीने आजच्या सामन्यात विजय मिळवत १४ गुण मिळवले. याशिवाय बंगलोर संघही १४ गुणांवर आहे. पण नेट रन रेटमध्ये दिल्ली वरचढ असल्याने दिल्ली चौथ्या तर बंगलोर पाचव्या स्थानी आहे. सध्याच्या घडीला दिल्लीला प्ले-ऑफमधील आपलं स्थान निश्चित करण्यासाठी मुंबई विरूद्धच्या आपला शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. तसे झाल्यास ते थेट पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. पण दिल्लीचा संघ मुंबई विरूद्ध पराभूत झाला, तर इतर सामन्यांच्या निकालावर त्यांचं भवितव्य ठरेल.

पराभवामुळे पंजाबसाठी प्ले-ऑफचं गणित झालं अधिकच कठीण

पंजाबला आजच्या पराभवामुळे नेट रन रेटमध्ये फटका बसला. आता पंजाबच्या वरती कोलकाता आणि बंगलोर हे दोन संघ आहेत. अशा परिस्थितीत पंजाबने हैदराबाद विरूद्धचा शेवटचा साखळी सामना मोठ्या फरकाने जिंकला तर त्यांच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत राहतील. पण त्या विजयासह त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होतील. अशा परिस्थितीत, दिल्ली आणि बंगलोर दोघांनी आपला शेवटचा सामना हरला, तरच पंजाब नेट रन रेटच्या जोरावर प्ले-ऑफच्या चौथ्या स्थानासाठी दावा सांगू शकेल.

उर्वरित सामने-

मंगळवार १७ मे - मुंबई वि हैदराबाद
बुधवार १८ मे - कोलकाता वि लखनौ
गुरूवार १९ मे - बंगलोर वि गुजरात
शुक्रवार २० मे - राजस्थान वि चेन्नई
शनिवार २१ मे - मुंबई वि दिल्ली
रविवार २२ मे - हैदराबाद वि पंजाब

पंजाबचा साखळी फेरीतील शेवटचा सामना अगदी शेवटी असला तरी, १९ मे च्या सामन्यात बंगलोरचा विजय झाला किंवा २१ मे च्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला, तर पंजाबचा शेवटचा सामना निव्वळ औपचारिकता असेल.

Web Title: IPL 2022 Playoffs Scenario for Punjab Kings after Delhi Capitals handed them measurable defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.