IPL 2022: आता घ्या कॅलक्युलेटर! मुंबईच्या हाती ४ टीमचं भवितव्य; कोणाकोणाची नय्या बुडवणार?

IPL 2022: मुंबई आणखी कोणाकोणाची गणितं बिघडवणार? प्ले ऑफची स्पर्धा आणखी तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 02:16 PM2022-05-17T14:16:21+5:302022-05-17T14:19:03+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2022 playoff equation after delhi capitals vs punjab kings match virat kohli rcb | IPL 2022: आता घ्या कॅलक्युलेटर! मुंबईच्या हाती ४ टीमचं भवितव्य; कोणाकोणाची नय्या बुडवणार?

IPL 2022: आता घ्या कॅलक्युलेटर! मुंबईच्या हाती ४ टीमचं भवितव्य; कोणाकोणाची नय्या बुडवणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये प्ले ऑफची स्पर्धा तीव्र झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा पराभव करत स्पर्धा आणखी तीव्र केली आहे. गुजरात टायटल्सनं प्ले ऑफमधील स्थान पक्कं केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान केव्हाच संपुष्टात आलं आहे. 

मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफच्या स्पर्धेतून कधीच बाहेर गेला आहे. मात्र आता मुंबईच्या हाती आरबीसीसह चार संघांचं भविष्य आहे. मुंबई २१ मे रोजी स्पर्धेतील आपला अखेरचा सामना खेळेल. या सामन्यात मुंबई दिल्लीशी दोन हात करेल. मुंबईनं दिल्लीचा पराभव केल्यास आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचेल. मात्र त्यासाठी आरसीबीला शेवटच्या लीग सामन्यात गुजरातला नमवावं लागेल.

दिल्लीनं मुंबईचा पराभव केल्यास, आरसीबीच्या प्ले ऑफच्या आशा मावळतील. कारण गुजरातचा पराभव करून त्यांचे १६ गुण होतील. मात्र नेट रन रेटमध्ये लखनऊ आणि दिल्लीला मागे टाकणं आरसीबीला अवघड आहे.

आयपीएल प्लेऑफचं समीकरण- 
लखनऊ सुपर जायंट्स: लखनऊचे सध्या १६ गुण आहेत. मात्र त्यांचं प्ले ऑफमधील स्थान निश्चित नाही. संघाचा शेवटचा सामना कोलकात्याशी आहे. तो जिंकल्यास त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश आहे. त्यांचा नेट रन रेट सध्या +0.262 आहे.

दिल्ली कॅपिटल्स: दिल्लीचे १३ सामन्यांनंतर १४ गुण आहेत. दिल्लीला मुंबईविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. त्यामुळे त्यांचे १६ गुण होतील आणि प्ले ऑफ गाठण्याची आशा कायम राहील. दिल्लीचा नेट रन रेट सध्या 0.255 आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: आरबीसीचे १३ सामन्यात १४ गुण आहेत. आरसीबीचा नेट रन रेट (-0.323) आहे. नेट रन रेट खराब असल्याचा फटका आरसीबीला बसू शकतो. आरसीबीचा शेवटचा सामना गुजरातविरुद्ध आहे. तो जिंकल्यास त्यांचे १६ गुण होतील.

राजस्थान रॉयल्स: राजस्थानचे १३ सामन्यांत १६ गुण आहेत. प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना चेन्नईचा पराभव करावा लागेल. हा सामन्यात राजस्थान पराभूत झाल्यास नेट रन रेन महत्त्वाचा ठरेल. राजस्थानचा नेट रन रेट सध्या (+0.304) आहे.

कोलकाता नाईट रायडर्स: कोलकात्याचे सध्या १३ सामन्यांत १२ गुण आहेत. त्यांचा शेवटचा सामना लखनऊविरुद्ध आहे. हा सामना जिंकल्यावरही कोलकात्याचं भवितव्य इतर संघांवर अवलंबून असेल. कोलकात्याचा नेट रन रेट (+0.160) आहे.

यासोबतच पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादचे संघदेखील प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेले नाहीत. हैदराबादनं मुंबई आणि पंजाबचा मोठ्या अंतरानं पराभव केल्यास, त्यांचे १४ गुण होतील. या परिस्थितीत हैदराबादला दुसऱ्या संघाच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. पंजाबचा शेवटचा सामना हैदराबादशी आहे. या परिस्थितीत पंजाब आणि हैदराबादमधील एकच संघ प्ले ऑफमध्ये पोहोचेल.

Web Title: ipl 2022 playoff equation after delhi capitals vs punjab kings match virat kohli rcb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.