Sara Tendulkar IPL 2022 MI vs SRH Live Updates : अग तू बघ मोठ्या स्क्रिनवर दिसतेस!; मित्रांनी खुणवलं अन् तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, कोण आहे ती?

प्रियाम गर्ग ( Priyam Garg) , राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना पळता भुई करून सोडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 10:15 PM2022-05-17T22:15:59+5:302022-05-17T23:05:28+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs SRH Live Updates : Spotted Sara Tendulkar at Wankhede Stadium for watching Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match, See pics  | Sara Tendulkar IPL 2022 MI vs SRH Live Updates : अग तू बघ मोठ्या स्क्रिनवर दिसतेस!; मित्रांनी खुणवलं अन् तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, कोण आहे ती?

Sara Tendulkar IPL 2022 MI vs SRH Live Updates : अग तू बघ मोठ्या स्क्रिनवर दिसतेस!; मित्रांनी खुणवलं अन् तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं, कोण आहे ती?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनीही आक्रमक सुरुवात केली. रोहितचे षटकार पाहण्यासारखे होते. पण, या सामन्यात एका तरुणीची  उपस्थिती लक्षवेधी ठरली.

प्रियाम गर्ग ( Priyam Garg) , राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना पळता भुई करून सोडले... अभिषेक ( ९)  तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर प्रियांम गर्ग व राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक खेळ केला. गर्ग व त्रिपाठी यांची ४३ चेंडूंवर ७८ धावांची भागीदारी १०व्या षटकात संपुष्टात आली. गर्ग २६ चेंडूंत  ४२ धावांवर माघारी परतला. पूरन २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारासह ३८ धावांवर बाद झाला. त्रिपाठी ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. पूरन व त्रिपाठी यांनी ४२ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली.  
डॅनिएल सॅम्स ( १-३९) व रिले मेरेडिथ ( १-४४) यांची चार षटकं महागडी ठरली. रमणदीप सिंगने ३ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हैदराबादने ६ बाद १९३ धावा केल्या. जसप्रीतने  २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरचा त्रिफळा उडवून मोठा विक्रम नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला जलदगती गोलंदाज ठरला. या विक्रमात भुवनेश्वर कुमार ( २२३) व जयदेव उनाडकट ( २०१) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.   

तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनीही आक्रमक सुरुवात केली. रोहितचे षटकार पाहण्यासारखे होते. स्टँडमध्ये सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरची ( Sara Tendulkar) उपस्थिती  लक्षवेधी ठरली. ( पाहा IPL 2022 - MI vs SRH सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

Web Title: IPL 2022 MI vs SRH Live Updates : Spotted Sara Tendulkar at Wankhede Stadium for watching Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Match, See pics 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.