Rishabh Pant IPL 2022 MI vs DC Live Updates : रिषभ पंत चुकला अन् RCBचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला; मुंबई इंडियन्सने विजयाने निरोप घेतला 

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवरील सामना चुरशीचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 11:27 PM2022-05-21T23:27:47+5:302022-05-21T23:28:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs DC Live Updates: RCB qualified for the IPL 2022 playoffs; Mumbai Indians bid farewell with victory | Rishabh Pant IPL 2022 MI vs DC Live Updates : रिषभ पंत चुकला अन् RCBचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला; मुंबई इंडियन्सने विजयाने निरोप घेतला 

Rishabh Pant IPL 2022 MI vs DC Live Updates : रिषभ पंत चुकला अन् RCBचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला; मुंबई इंडियन्सने विजयाने निरोप घेतला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवरील सामना चुरशीचा झाला. DC संघ दडपणाखाली खेळला. जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवॉल्ड ब्रेव्हिस आणि टीम डेव्हिड हे मुंबई इंडियन्सचे मॅच विनर खेळाडू ठरले. DC चा कर्णधार रिषभ पंतने ( Rishabh Pant) आज चूका केल्या. ब्रेव्हिस व डेव्हिड ( ०) यांना त्याने दिलेले जीवदान दिल्लीला महागात पडले. मुंबईच्या विजयानंतर वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) नावाचा गजर झाला. DC च्या पराभवामुळे RCBचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला आणि आता एलिमिनेटर मध्ये त्यांच्यासमोर लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान असणार आहे. 

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांकडूनही जबरदस्त प्रतिहल्ला झाला.  रोहित १३ चेंडूंत २ धावांवर बाद झाला. डेवॉल्ड ब्रेव्हिस व इशान MIच्या डावाला आकार देत होते. इशान व ब्रेव्हिस यांनी ३७ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. १०व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर इशानने १८ धावा चोपल्या, तरीही रिषभने १२वे षटक त्याला दिले. रिषभचा हा विश्वास कुलदीपने सार्थ ठरवला आणि इशान ३५ चेंडूंत ३ चौकार व  ४ षटकारांसह ४८ धावांवर झेलबाद झाला. त्याच षटकात ब्रेव्हिस ( २५) झेल उडाला होता आणि रिषभ मेरा कॅच है म्हणत पुढे आला, परंतु त्याच्याकडून हा झेल सुटला. कुलदीपने ४ षटकांत ३३ धावांत १ विकेट घेतली. 


१५व्या षटकात  शार्दूलने DCला ब्रेव्हिसची ( ३७) विकेट मिळवून दिली. शार्दूलने टाकलेल्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फटका मारण्याच्या प्रयत्नात ब्रेव्हिस त्रिफळाचीत  झाला. त्याच षटकात टीम डेव्हिड ( ०) झेलबाद होता, परंतु रिषभने DRS घेतला नाही. चेंडू डेव्हिडच्या बॅटला टच झाल्याचे अल्ट्राएजमध्ये दिसले आणि DC च्या डगआऊटमध्ये साऱ्यांनी डोक्यावर हात मारला. पुढच्याच चेंडूवर डेव्हिडने षटकार खेचला. हा निर्णय चुकल्याने रिषभ पूर्णपणे गोंधळला आणि नॉर्खियाच्या गोलंदाजीवर DRS ची गरज नसताना घेतला. १८व्या षटकात दोन खणखणीत षटकार खाल्ल्यानंतर शार्दूलने DCला डेव्हिडची विकेट मिळवून दिली. त्याने ११ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३४ धावा करून सामना मुंबईच्या पारड्यात आणून दिला होता. मुंबईला विजयासाठी ५ धावा हव्या असताना तिलक वर्मा २१ धावांवर माघारी परतला. 


२०व्या षटकात खलिल अहमदने पहिला चेंडू नो बॉल फेकला आणि त्यावर DC ला फ्री हिट मिळाले. रमणदीपने चौकार खेचून मुंबईचा विजय पक्का केला. दिल्लीचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले. 

जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज स्टार ठरला. बुमराहने ४ षटकांत २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. डेव्हिड वॉर्नर ( ५), मिचेल मार्श ( ०), पृथ्वी शॉ ( २४) आणि सर्फराज खान ( १०) हे फलंदाज माघारी परतल्याने दिल्लीच्या ४ बाद ५० धावा धाल्या होत्या. रोव्हमन पॉवेल ( ४३) व रिषभ पंत ( ३९) यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. . दिल्लीने ७ बाद १५९ धावा केल्या. अक्षरने नाबाद १९ धावा केल्या. मयांक मार्कंडेने ४ षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली, तर हृतिक शोकिनने ४ षटकांत ३४ धावा दिल्या.  रमणदीप सिंगने २ षटकांत २९ धावांत २ विकेट्स घेतल्या. डॅनिएल सॅम्सला एक विकेट मिळाली. 

Web Title: IPL 2022 MI vs DC Live Updates: RCB qualified for the IPL 2022 playoffs; Mumbai Indians bid farewell with victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.