Tilak Varma IPL 2022 : CSK ला पराभूत केल्यानंतर Mumbai Indians च्या तिलक वर्माने MS Dhoni समोर हात जोडले?; सत्य जाणून वाढेल आदर 

IPL 2022 MI vs CSK : मुंबई इंडियन्सने गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये तिसऱ्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 03:54 PM2022-05-13T15:54:36+5:302022-05-13T15:59:51+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs CSK : The celebration by Tilak Varma was for his coach who came to watch him bat at Wankhede stadium yesterday, Video | Tilak Varma IPL 2022 : CSK ला पराभूत केल्यानंतर Mumbai Indians च्या तिलक वर्माने MS Dhoni समोर हात जोडले?; सत्य जाणून वाढेल आदर 

Tilak Varma IPL 2022 : CSK ला पराभूत केल्यानंतर Mumbai Indians च्या तिलक वर्माने MS Dhoni समोर हात जोडले?; सत्य जाणून वाढेल आदर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 MI vs CSK : मुंबई इंडियन्सने गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये तिसऱ्या विजयाची नोंद केली. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी ठेवलेले ९८ धावांचे लक्ष्य त्यांनी पाच विकेट्स राखून पार केले. माफक लक्ष्याचा पाठलाग करतानाही MIचे चार फलंदाज पॉवर प्लेमध्येच माघारी परतले होते. तिलक वर्मा ( Tilak Varma) व हृतिक शोकिन यांनी खिंड लढवली आणि ४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून मुंबईला विजय मिळवून दिला. टीम डेव्हिडने विजयी षटकार खेचल्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला तिलक प्रेक्षकांकडे पाहून नतमस्तक झाला आणि कुणासाठी तरी त्याने हात जोडले. 

ऋतुराज गायकवाड ( ७), डेवॉन ( ०) , रॉबिन उथप्पा ( १)  व मोईन अली ( ०), अंबाती रायुडू ( १०), शिवम दुबे ( १०)  व ड्वेन ब्राव्हो ( १२) यांना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जाळ्यात अडकवले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni)ने ३३ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. चेन्नईचा डाव १६ षटकांत ९७ धावांवर गडगडला. डॅनिएल स‌‌ॅम्सने १६ धावांत ३, रिले मेरेडिथने २७ धावांत २ व कुमार कार्तिकेयने २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह व रमणदीप सिंग यांच्या वाट्याला प्रत्येकी एक विकेट आली.

प्रत्युत्तरात मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा ( १८) व इशान किशन ( ६) हेही झटपट माघारी परतले. डॅनिएल स‌ॅम्स ( १) व त्रिस्ताना स्तुब्स ( ०) हेही बाद झाले. मुकेश चौधरीने ४ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  सिमरजीत सिंगने २२ धावांत १ विकेट घेतली. पण, तिलक वर्मा व हृतिक शोकिन  (१८) यांनी  ४८ धावांची भागीदारी केली. मुंबईने हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला.  टीम डेव्हिडने  (१६*) दोन खणखणीत सिक्स मारले आणि विजय पक्का केला. तिलक ३४ धावांवर नाबाद राहिला. मुंबईने १४.५ षटकांत ५ बाद १०३ धावा केल्या.

तिलक वर्माचे प्रशिक्षक  सलाम बयाश ( Salam Bayash Bayash) हे हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर आले होते आणि मॅच विनिंग खेळी केल्यानंतर तिलकने त्यांचे आभार मानले आणि सामना संपताच हात जोडून नमस्कार केला. 


कोण आहे तिलक वर्मा? 
हैदराबादमध्ये ८ नोव्हेंबर २००२मध्ये त्याचा जन्म झाला.  २०१८-१९मध्ये त्याने हैदराबादकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून ट्वेंटी-२०त पदार्पण केले. २०२०च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील संघात त्याचे नाव होते.  आयपीएल 2022 मेगा लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने 19 वर्षीय खेळाडूला 1.70 कोटी रुपयांना विकत घेतले. या खेळाडूचे वडील इलेक्ट्रिशियन असून, या तरुण खेळाडूला त्याच्या पहिल्या IPL कमाईने वडिलांसाठी घर खरेदी करायचे आहे.

तिलक वर्मा 2020 मध्ये अंडर-19 विश्वचषक खेळला होता. तिलकने 4 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 31.87 च्या सरासरीने 255 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने 16 लिस्ट ए सामने देखील खेळले आहेत. लिस्ट ए मध्ये टिळकने 52.36 च्या सरासरीने 784 धावा केल्या आहेत आणि 15 टी -20 सामन्यांमध्ये 29.30 च्या सरासरीने 381 धावा केल्या आहेत. गेल्या मोसमातील सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये 147.26 च्या स्ट्राइक रेटने 215 धावा केल्या.
 

Web Title: IPL 2022 MI vs CSK : The celebration by Tilak Varma was for his coach who came to watch him bat at Wankhede stadium yesterday, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.