MS Dhoni IPL 2022 MI vs CSK Live Update : DRS, PowerCut?; पराभवानंतर CSK कॅप्टन महेंद्रसिंग धोनी बघा काय म्हणाला... 

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या तीन षटकांतच चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK ) पराभव निश्चित झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:17 PM2022-05-12T23:17:17+5:302022-05-12T23:41:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 MI vs CSK Live Update : Whenever we start, we need the same kind of attitude and that's what is needed in the shortest format, Say MS Dhoni  | MS Dhoni IPL 2022 MI vs CSK Live Update : DRS, PowerCut?; पराभवानंतर CSK कॅप्टन महेंद्रसिंग धोनी बघा काय म्हणाला... 

MS Dhoni IPL 2022 MI vs CSK Live Update : DRS, PowerCut?; पराभवानंतर CSK कॅप्टन महेंद्रसिंग धोनी बघा काय म्हणाला... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या तीन षटकांतच चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK ) पराभव निश्चित झाला होता. Power Cut मुळे CSK ला पहिल्या तीन षटकांत DRS घेता आला नाही आणि त्यात त्यांनी डेवॉन कॉनवे व रॉबिन उथप्पा यांची ( नसलेली) विकेट गमावली. चेन्नई ९८ धावांचेच लक्ष्य उभं करू शकली आणि  मुंबई इंडियन्सने १४.५ षटकांत ५ विकेट्सच्या मोबदल्यात ते पार केले. या विजयानंतर महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) त्याच्या गोलंदाजांचे कौतुक केले अन् भविष्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे तेही सांगितले. 

ऋतुराज गायकवाड ( ७), डेवॉन ( ०) , रॉबिन उथप्पा ( १)  व मोईन अली ( ०), अंबाती रायुडू ( १०), शिवम दुबे ( १०)  व ड्वेन ब्राव्हो ( १२) यांना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जाळ्यात अडकवले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) एकटा खिंड लढवताना दिसला. त्याने ३३ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. चेन्नईचा डाव १६ षटकांत ९७ धावांवर गडगडला. डॅनिएल स‌‌ॅम्सने १६ धावांत ३, रिले मेरेडिथने २७ धावांत २ व कुमार कार्तिकेयने २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह व रमणदीप सिंग यांच्या वाट्याला प्रत्येकी एक विकेट आली. प्रत्युत्तरात मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा ( १८) व इशान किशन ( ६) हेही झटपट माघारी परतले. डॅनिएल स‌ॅम्स ( १) व त्रिस्ताना स्तुब्स ( ०) हेही बाद झाले. मुकेश चौधरीने ४ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  सिमरजीत सिंगने २२ धावांत १ विकेट घेतली. 

पण, तिलक वर्मा व हृतिक शोकिन यांनी MIचा डाव सावरला. त्यांना नशिबाचीही साथ मिळाली. या दोघांनी सावध खेळ करताना ४८ धावांची भागीदारी केली. शोकिन १८ धावांवर मोईन अलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पण, तो त्याची कामगिरी चोख बजावून गेला. मुंबईने हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. विजयासाठी ९ धावा हव्या असताना टीम डेव्हिडने दोन खणखणीत सिक्स  खेचून विजय पक्का केला. तिलक ३४ धावांवर नाबाद राहिला. मुंबईने १४.५ षटकांत ५ बाद १०३ धावा केल्या. ( पाहा IPL 2022 - MI vs CSK  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

महेंद्रसिंग धोनी काय म्हणाला?
 

''खेळपट्टी गोलंदाजांना पोषक असती तर १३० पेक्षा कमी धावांचा बचाव करता आला असता. तरीही मी गोलंदाजांना निकालाची चिंता न करता टिच्चून मारा करून प्रतिस्पर्धींना दडपणात ठेवण्यास सांगितले होते. मुकेश व सिमरजीत या दोघांनी सुरेख कामगिरी केली. अशा प्रकारच्या सामन्यातील कामगिरीने त्यांना पुढे खूप मदत मिळेल. त्यांचा स्वतःवरील विश्वास अधिक वाढेल. त्यामुळे ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अशाच प्रकारचा अॅटिट्यूड गरजेचा आहे,''असे धोनी म्हणाला.

''आम्ही अशा परिस्थितीतून  जातोय की जिथे आमच्याकडे जलदगती गोलंदाजांची मजबूत राखीव फळीच नाही. या युवा गोलंदाजांना परिपक्व होण्यासाठी वेळ द्यायला हवा. आयपीएलने या खेळाडूंना ती संधी दिलीय. हे दोन्ही जलदगती गोलंदाज आमच्यासाठी लॉटरीसारखे आहेत. पुढील पर्वात आमच्या ताफ्यात दोन जलदगती गोलंदाज दाखल होणार आहेत, हे विसरू नका,''असेही त्याने म्हटले. धोनीने यावेळी फलंदाजांना आणखी मेहनत घेण्याचा सल्ला दिला. 

धोनीने DRS, PowerCut या विषयावर बोलणे टाळले... 


 

Web Title: IPL 2022 MI vs CSK Live Update : Whenever we start, we need the same kind of attitude and that's what is needed in the shortest format, Say MS Dhoni 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.