Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda ला स्टम्पिंग करण्यासाठी संजू सॅमसनने किती प्रयत्न केले?; Umpire ही चक्रावले, Video 

IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : लखनौ सुपर जायंट्सची अवस्था  ३ बाद २९ अशी अवस्था असताना मदतीला कृणाल पांड्या ( Krunal Panday ) व दीपक हुडा ( Deepak Hooda)  ही जोडी धावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:17 PM2022-05-15T23:17:21+5:302022-05-15T23:18:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda is stumped for 59, How many attempts did Sanju Samson make to get that stumping?, Video  | Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda ला स्टम्पिंग करण्यासाठी संजू सॅमसनने किती प्रयत्न केले?; Umpire ही चक्रावले, Video 

Sanju Samson IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda ला स्टम्पिंग करण्यासाठी संजू सॅमसनने किती प्रयत्न केले?; Umpire ही चक्रावले, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : लखनौ सुपर जायंट्सची अवस्था  ३ बाद २९ अशी अवस्था असताना मदतीला कृणाल पांड्या ( Krunal Panday ) व दीपक हुडा ( Deepak Hooda)  ही जोडी धावली. त्यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पण, आर अश्विनच्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली आणि LSGची गळती सुरू झाली. युजवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal) १६व्या षटकात LSGला मोठा धक्का दिला. पण, दीपक हुडाला यष्टीचीत  करण्यासाठी RRचा कर्णधार व यष्टिरक्षक संजू सॅमसन ( Sanju Samson) याला खूप प्रयत्न करावे लागले. संजूने नेमके काय केले, हे पाहून अम्पायरही चक्रावले आणि त्यांना तिसऱ्या अम्पायरची मदत घ्यावी लागली. 

१७८ धावांच्या प्रत्युत्तरात लखनौला ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात दोन धक्के दिले. क्विंटन ड कॉक ( ७) व आयुष बदोनी ( ०) सलग दोन चेंडूंवर बाद झाले. प्रसिद्ध कृष्णाने पुढील षटकात LSGचा कर्णधार लोकेश राहुलला ( १०) बाद केले आमि लखनौची अवस्था ३ बाद २९ अशी झाली. दीपक हुडा व कृणाल पांड्या यांनी लखनौच्या डावाला आकार दिला. पण, जोस बटलरने प्रसांगवधान राखताना ही जोडी तोडली. आर अश्विनच्या गोलंदाजीवर कृणालने लाँग ऑफच्या दिशेने खणखणीत फटका मारला. चेंडू सीमारेषेपार जातोय असे दिसताना बटलरने तो टिपला आणि तोल जाण्यापूर्वी लगेच तो रियान परागकडे फेकला. रियानने चेंडू झेलून कृणालला माघारी जाण्यास भाग पाडले. कृणाल ( २५) व दीपक यांची ६५ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

 

दरम्यान, दीपकने आयपीएल २०२२मधील चौथे अर्धशतक पूर्ण केले आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानी सरकला. त्यानंतर चहलच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा दीपकचा प्रयत्न फसला. संजूच्या हाती चेंडू गेला आणि त्याने बेल्स उडवल्या. पण, जेव्हा बेल्स उडाल्या तेव्हा चेंडू हातात होता की नाही, हे संजूला समजले नाही आणि त्याने लगेच पुन्हा चेंडू हातात घेऊन स्टम्पच उखडून काढला.  दीपकची विकेट तपासण्यासाठी तिसऱ्या अम्पायरची मदत घ्यावी लागली. दीपक ३९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५९ धावांवर माघारी परतला. ओबेड मॅकॉयने जेसन होल्डर ( १) व दुष्मंथा चमिरा( ०) यांना एकाच षटकात बाद केले. लखनौची अवस्था ७ बाद १२० झाली.  

Web Title: IPL 2022 LSG vs RR Live Updates : Deepak Hooda is stumped for 59, How many attempts did Sanju Samson make to get that stumping?, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.