KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Update : लोकेश राहुलचा नाद करायचा नाय; KKRच्या गोलंदाजांची धुलाई करताना विराट कोहली, शिखर धवनच्या विक्रमाशी बरोबरी 

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update :     लोकेश राहुल  ( KL Rahul ) ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 08:33 PM2022-05-18T20:33:22+5:302022-05-18T20:33:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs KKR Live Update : KL Rahul reaches 500 runs for the 5th consecutive season, equal virat kohli and shikhar Dhawan Record  | KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Update : लोकेश राहुलचा नाद करायचा नाय; KKRच्या गोलंदाजांची धुलाई करताना विराट कोहली, शिखर धवनच्या विक्रमाशी बरोबरी 

KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Update : लोकेश राहुलचा नाद करायचा नाय; KKRच्या गोलंदाजांची धुलाई करताना विराट कोहली, शिखर धवनच्या विक्रमाशी बरोबरी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Update :    लोकेश राहुल  ( KL Rahul ) व क्विंटन डी कॉक या जोडीने आज कमाल करताना KKRच्या गोलंदाजांना चोपून काढली. LSGच्या सलामीवीरांनी पहिला पॉवर प्ले सावधपणे खेळून काढल्यानंतर फटकेबाजीला सुरूवात केली. क्विंटननं ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. लोकेशनेही मोठ्या विक्रमाला गवसणी घातलाना विराट कोहली व शिखर धवनच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. लखनौच्या ताफ्यात तीन बदल... दुखापतीमुळे कृणाल पांड्या आजच्या सामन्याला मुकला आहे. त्याच्यासह दुष्मंथा चमिरा व आयुष बदोनी यांना आज विश्रांती दिली गेली आहे. त्यांच्याजागी मनन वोहरा, के गौथम व एव्हिन लुईस हे संघात आले आहेत. कोलकाताच्या ताफ्यात दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणेच्या जागी अभिजित तोमर खेळणार आहे. तिसऱ्या षटकात अभिजितने क्विंटन डी कॉकचा झेल टाकला. त्याच षटकाचा शेवट क्विंटनने खणखणीत षटकार मारून केला. पण, KKRच्या गोलंदाजांनी लखनौच्या धावगतीवर लगाम लावला होता. पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांना ४५ धावा करता आल्या. ४३ चेंडूंत त्यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली.

सेट झाल्यानंतर क्विंटन व लोकेश यांनी फटकेबाजीला सुरुवात केली. १०व्या षटकात टीम साऊदीला षटकार खेचून लोकेशने यंदाच्या पर्वातही ५०० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएलमध्ये सलग पाचव्या पर्वात त्याने हा पराक्रम केला. लोकेशने २०१८ ते २०२२ या पर्वांत अनुक्रमे ६५९, ५९३, ६७०, ६२६ आणि ५०९* धावा केल्या आहेत.  आयपीएलमध्ये पाच पर्वांत ५००+ धावा करणारा लोकेश तिसरा फलंदाज ठरला. विराट कोहली व शिखर धवन यांनी हा पराक्रम केला. डेव्हिड वॉर्नरने ६ वेळा ही कामगिरी केली आहे.  500+ runs in most IPL Seasons  ( पाहा IPL 2022 - LSG vs KKR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

कोलकाता नाईट रायडर्स - अभिजित तोमर, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितिश राणा, सॅम बिलिंग्स, रिंकू सिंग, आंद्रे रसेल,  सुनील नरीन, उमेश यादव, टीम साऊदी, वरुण चक्रवर्थी  ( KKR: 1 Abhijeet Tomar, 2 Venkatesh Iyer, 3 Shreyas Iyer (capt), 4 Nitish Rana, 5 Sam Billings (wk), 6 Rinku Singh, 7 Andre Russell, 8 Sunil Narine, 9 Umesh Yadav, 10 Tim Southee, 11 Varun Chakravarthy)
लखनौ सुपर जायंट्स - क्विंटन डी कॉक, लोकेश राहुल, मनन वोहरा, एव्हिन लुईस, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, कृष्णप्पा गौथम, जेसन होल्डर, आवेश खान, मोहसिन खान, रवी बिश्नोई ( LSG: 1 Quinton de Kock (wk), 2 KL Rahul (capt), 3 Manan Vohra 4 Evin Lewis, 5 Deepak Hooda, 6 Marcus Stoinis, 7 Krishnappa Gowtham, 8 Jason Holder, 9 Avesh Khan, 10 Mohsin Khan, 11 Ravi Bishnoi ) 

Web Title: IPL 2022 LSG vs KKR Live Update : KL Rahul reaches 500 runs for the 5th consecutive season, equal virat kohli and shikhar Dhawan Record 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.