Shreyas Iyer IPL 2022 : KKRचा कर्णधार श्रेयस अय्यरचा पारा चढला, बाद झाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या प्रशिक्षकांना केली शिविगाळ?, Video

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्या इनिंग्जची सुरुवात चांगली केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:36 PM2022-04-19T18:36:46+5:302022-04-19T18:37:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, KKR vs RR : Shreyas Iyer arguing with Kolkata Knight Riders Coach Brendon Maccullum, Watch Video  | Shreyas Iyer IPL 2022 : KKRचा कर्णधार श्रेयस अय्यरचा पारा चढला, बाद झाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या प्रशिक्षकांना केली शिविगाळ?, Video

Shreyas Iyer IPL 2022 : KKRचा कर्णधार श्रेयस अय्यरचा पारा चढला, बाद झाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या प्रशिक्षकांना केली शिविगाळ?, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्या इनिंग्जची सुरुवात चांगली केली. पण, काल राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या पराभवामुळे त्याचा पारा भलताच चढलेला पाहायला मिळाला. हातचा घास हिरावल्यामुळे श्रेयस एवढा संतापला की त्याने मैदानावर असताना सहकारी वेंकटेश अय्यर याच्यावर राग काढला. बाद झाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या प्रशिक्षकालाही त्याने सोडले नाही. तो प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम याला नेमकं काय म्हणाला, हे माहीत नाही. पण, तो काहीतरी तक्रार करताना दिसला. काही वेबसाईटच्या वृत्तानुसार त्याने प्रशिक्षकाला शिविगाळ केल्याचे म्हटले आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यात ४००+ धावा झाल्या. राजस्थानच्या २१७ धावांचा पाठलाग करताना कोलकाताने २१० धावांपर्यंत मजल मारली. युजवेंद्र चहलने एका षटकात हॅटट्रिकसह चार विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. चहलने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. KKRचा कर्णधार श्रेयसने ८५ धावा करून संघर्ष केला, परंतु चहलने त्याची विकेट घेतली. त्यानंतर श्रेयस संतापला. पेव्हेलियनला परत जाताना श्रेयस KKRच्या डग आऊटच्या इथे थांबला आणि प्रशिक्षकांकडे बघून काहीतरी बडबडला.  


 राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलर ( १०३), देवदत्त पडिक्कल ( २४), संजू सॅमसन ( ३८) आणि शिमरोन हेटमायर ( २६) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर २१७ धावा कुटल्या. त्यानंतर कोलकातानेही दमदार सुरूवात केली. आरोन फिंच ( ५८) व श्रेयस अय्यर ( ८५) यांनी संघाला जवळपास विजय मिळवून दिलाच होता. पण, १७व्या षटकात युजवेंद्र चहलने ४ विकेट्स घेतल्या आणि KKRला ७ धावांनी हार मानावी लागली. 

Web Title: IPL 2022, KKR vs RR : Shreyas Iyer arguing with Kolkata Knight Riders Coach Brendon Maccullum, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.