IPL 2022: ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड करणाऱ्या प्लेयरला BCCI नं फटकारलं, दिली वॉर्निंग

ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडच्या या कृत्याची माहिती मिळताच BCCI अॅक्शनमोडमध्ये आले. BCCI ने मॅथ्यू वेडला IPL आचार संहितेच्या कलम 2.5 नुसार लेव्हल वनचा गुन्हेगार मानले असून जबरदस्त फटकारले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:27 PM2022-05-20T13:27:52+5:302022-05-20T13:31:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022: IPL 2022 bcci gives warning matthew wade gujarat titans | IPL 2022: ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड करणाऱ्या प्लेयरला BCCI नं फटकारलं, दिली वॉर्निंग

IPL 2022: ड्रेसिंग रूममध्ये तोडफोड करणाऱ्या प्लेयरला BCCI नं फटकारलं, दिली वॉर्निंग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गुजरात टायटन्सचा (GT) विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडला (Matthew Wade) रॉयल चॅलेन्जर्स बेंगळुरूविरुद्ध (RCB) गुरुवारी झालेल्या IPL सामन्यात वादग्रस्तपद्धतीने आऊट देण्यात आले. यानंतर संतापलेल्या वेडने ड्रेसिंग रुममध्ये जाऊन जबरदस्त तोडफोड केली. 

BCCI नं फटकारलं -
ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडच्या या कृत्याची माहिती मिळताच BCCI अॅक्शनमोडमध्ये आले. BCCI ने मॅथ्यू वेडला IPL आचार संहितेच्या कलम 2.5 नुसार लेव्हल वनचा गुन्हेगार मानले असून जबरदस्त फटकारले आहे.

वेडवर आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप - 
BCCI च्या आयपीएल कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, ‘वेडने आयपीएल आचार संहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल वनचा गुन्हा आणि शिक्षा मान्य केली आहे. आचार संहितेच्या लेव्हल वनच्या उल्लंघनात मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो.’

का भडकला होता मॅथ्यू वेड?
ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याचा वेडचा प्रयत्न चुकला अन् चेंडू पॅडवर आदळला. RCB ने अपील करताच मैदानावरील अम्पायरने बाद दिले. पण, वेडने DRS घेतला. त्याच्या मते चेंडू व बॅट यांचा संपर्क झाला होता, परंतु अल्ट्रा एजमध्ये तसे काहीच दिसले नाही. यामुळे वेड प्रचंड संतापला. ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्याने पहिले हेल्मेट फेकले आणि नंतर बॅटने आदळ आपट केली... 

Web Title: IPL 2022: IPL 2022 bcci gives warning matthew wade gujarat titans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.