Delhi Capitals IPL 2022, DC vs PBKS Live Updates : जखमी वाघ अधिक खतरनाक!; दिल्ली कॅपिटल्सने सिद्ध केले, पंजाब किंग्सला सहज नमवले; १०.३ षटकांत खेळ खल्लास

IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचे, सपोर्ट स्टाफचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:19 PM2022-04-20T22:19:15+5:302022-04-20T22:19:58+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, DC vs PBKS Live Updates : Prithvi Shaw's 41 in just 20 balls, David Warner 60 runs, Delhi Capitals chase down 116 runs from just 10.3 overs against Punjab Kings   | Delhi Capitals IPL 2022, DC vs PBKS Live Updates : जखमी वाघ अधिक खतरनाक!; दिल्ली कॅपिटल्सने सिद्ध केले, पंजाब किंग्सला सहज नमवले; १०.३ षटकांत खेळ खल्लास

Delhi Capitals IPL 2022, DC vs PBKS Live Updates : जखमी वाघ अधिक खतरनाक!; दिल्ली कॅपिटल्सने सिद्ध केले, पंजाब किंग्सला सहज नमवले; १०.३ षटकांत खेळ खल्लास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Delhi Capitals vs Punjab Kings Live Updates : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचे, सपोर्ट स्टाफचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. संघातील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतरही हा संघ मैदानावर उतरला आणि पंजाब किंग्सवर दणदणीत विजय मिळवला. पंजाब किंग्सने IPL 2022 मधील निचांक धावसंख्येची नोंद केली आणि दिल्लीच्या सलामीवीरांनीच हे माफक लक्ष्य पार केले. खलिल अहमद ( २-२१), ललित यादव ( २-११), अक्षर पटेल ( २-१०) व कुलदीप यादव ( २-२४) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  

शिखर धवन ( ९)  व मयांक अग्रवाल ( २४) यांना साजेशी सुरूवात करता आली नाही. रिषभने कल्पक नेतृत्व करताना सुरेख क्षेत्ररक्षण लावले. लाएम लिव्हिंगस्टोन ६व्या षटकात अक्षर पटेलला पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाला. त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो ( ९) खलिल अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पंजाब किंग्सचे ४ फलंदाज ५४ धावांवर माघारी परतले. जितेश शर्मा व शाहरूख खान यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. अक्षर  पटेलने पंजाबला आणखी एक धक्का देताना जितेशला ३२ धावांवर LBW केले. त्यानंतर कुलदीप यादवने १४व्या षटकात कागिसो रबाडा व नॅथन एलिस यांना त्रिफळाचीत केले. खलिलने १५व्या षटकात शाहरुखची ( १२) विकेट घेत पंजाबची अवस्था ८ बाद ९२ अशी केली.  


स्टार फलंदाज ढेपाळल्यानंतर राहुल चहर व अर्षदीप सिंग यांच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचेच होते. तरीही चहरने १ चौकार व १ षटकारासह १२ धावा केल्या. ललित यादवने त्याला बाद केले. पंजाबचा संपूर्ण संघ ११५ धावांवर तंबूत परतला. प्रत्युत्तरात, पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांनी आक्रमक सुरूवात करून सामना लवकर संपवण्याचा निर्धार दाखवला. या दोघांनी २१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पृथ्वीने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा याच सामन्यात ओलांडला. दिल्लीने ६ षटकांत ८१ धावा चोपून IPL 2022 मधील पॉवर प्लेमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. राहुल चहरने ही भागीदारी संपुष्टात आणली. पृथ्वी २० चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४१ धावांवर बाद झाला.


डेव्हिड वॉर्नरने सलग तिसरे अर्धशतक झळकावताना दिल्लीचा विजय पक्का केला. वॉर्नरने ३० चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून नाबाद ६० धावा करताना दिल्लीला १०.३ षटकांत ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. सर्फराज खान १२ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: IPL 2022, DC vs PBKS Live Updates : Prithvi Shaw's 41 in just 20 balls, David Warner 60 runs, Delhi Capitals chase down 116 runs from just 10.3 overs against Punjab Kings  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.