IPL 2021, RCB Vs KKR: ‘हे घृणास्पदच!, सभ्य बनण्याचा प्रयत्न करा’, ट्रोलर्सवर Glenn Maxwell भडकला

IPL 2021, RCB Vs KKR: Kolkata Knight Ridersने ४ गड्यांनी विजय मिळवीत RCBला स्पर्धेबाहेर केले. मात्र, यानंतर आरसीबीचे अष्टपैलू खेळाडू Glenn Maxwell आणि Dan Christian यांच्यासह ख्रिस्टियनची गर्भवती गर्लफ्रेंड Georgia Dunn हिला सोशल मीडियावर काही नेटिझन्सनी वाईटरीत्या ट्रोल केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 12:05 PM2021-10-13T12:05:40+5:302021-10-13T12:07:43+5:30

IPL 2021, RCB Vs KKR: ‘It’s disgusting !, try to be polite’, Glenn Maxwell lashes out at trolls | IPL 2021, RCB Vs KKR: ‘हे घृणास्पदच!, सभ्य बनण्याचा प्रयत्न करा’, ट्रोलर्सवर Glenn Maxwell भडकला

IPL 2021, RCB Vs KKR: ‘हे घृणास्पदच!, सभ्य बनण्याचा प्रयत्न करा’, ट्रोलर्सवर Glenn Maxwell भडकला

Next

शारजा : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (आरसीबी) यंदाच्या आयपीएल सत्रातील प्रवास सोमवारी बाद फेरीत संपुष्टात आला. कोलकाता नाइट रायडर्सने ४ गड्यांनी विजय मिळवीत आरसीबीला स्पर्धेबाहेर केले. मात्र, यानंतर आरसीबीचे अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि डॅन ख्रिस्टियन यांच्यासह ख्रिस्टियनची गर्भवती गर्लफ्रेंड जॉर्जिया डन हिला सोशल मीडियावर काही नेटिझन्सनी वाईटरीत्या ट्रोल केले. 
यावरून मॅक्सवेल आणि ख्रिस्टियन यांनी या बेशिस्त नेटिझन्सचा निषेध करीत या ट्रोलर्सना कचरा आणि अत्यंत घृणास्पद व्यवहार म्हटले. तसेच, याप्रकरणी विनाकारण माझ्या गर्लफ्रेंडवर टीका करू नका, असेही ख्रिस्टियनने बजावले.
 सोशल मीडियावर जो कचरा येत आहे, तो अत्यंत घृणास्पद आहे. आम्हीही मनुष्य आहोत, आम्हीही दररोज सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.’

Web Title: IPL 2021, RCB Vs KKR: ‘It’s disgusting !, try to be polite’, Glenn Maxwell lashes out at trolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app