T20 World Cup, BAN v OMN : बांगलादेशचा डाव गडगडला, ८ फलंदाज ५२ धावांत परतले माघारी; ओमानच्या गोलंदाजांची लय भारी कामगिरी

T20 World Cup, OMAN V BANGLADESH : स्कॉटलंडकडून हार मानावी लागल्यानंतर बांगलादेश दुसऱ्या सामन्यात कमबॅक करतील असे वाटले होते, परंतु ओमान संघानंही त्यांची हालत खराब केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:39 PM2021-10-19T21:39:39+5:302021-10-19T21:41:14+5:30

IPL 2021,  BAN v OMN : Bangladesh bowled out for 153 against Oman. Great bowling display by Oman | T20 World Cup, BAN v OMN : बांगलादेशचा डाव गडगडला, ८ फलंदाज ५२ धावांत परतले माघारी; ओमानच्या गोलंदाजांची लय भारी कामगिरी

T20 World Cup, BAN v OMN : बांगलादेशचा डाव गडगडला, ८ फलंदाज ५२ धावांत परतले माघारी; ओमानच्या गोलंदाजांची लय भारी कामगिरी

Next

T20 World Cup, OMAN V BANGLADESH : स्कॉटलंडकडून हार मानावी लागल्यानंतर बांगलादेश दुसऱ्या सामन्यात कमबॅक करतील असे वाटले होते, परंतु ओमान संघानंही त्यांची हालत खराब केली. मोहम्मद नईम व शाकिब अल हसन खेळपट्टीवर असेपर्यंत सारेकाही बांगलादेशच्या बाजूनं होतं. पण ओमानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना जबरदस्त पुनरागमन केलं आणि त्यांनी बांगलादेशच्या ८ फलंदाजांना ५२ धावांवर माघारी पाठवलं. आज ओमाननं हा सामना जिंकला, तर बांगलादेशचे Super 12मध्ये प्रवेश करण्याचे आव्हान इथेच संपेल.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशचे दोन फलंदाज २१ धावांवर माघारी परतले होते. लिटन दास ( ६) व मेहदी हसन ( ०) यांना अनुक्रमे बिलाल खान व फय्याज बट यांनी बाद केले. बटनं स्वतःच्याच गोलंदाजीवर हसनचा अफलातून झेल टिपला. पण, नईम व शाकिब यांनी बांगलादेशच्या डावाला आकार देताना तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. शाकिबनं २९ चेंडूंत ६ चौकारांसह ४२ धावा केल्य. एक धाव घेण्याच्या प्रयत्नात आकिब इलियासनं बांगलादेशच्या अष्टपैलूला धावबाद केले.

त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी लाईनच लावली. बिबाल खान, फय्याज बट व कलीमुल्लाह यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना बांगलादेशच्या ८ फलंदाजांना ५२ धावांत माघारी पाठवले. नईम ५० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर माघारी परतला. बांगलादेशचा डाव २ बाद १०१ धावांवरून १५३ धावांवर गडगडला. बांगलादेशनं ओमानसमोर विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ( Oman needs 154 runs to knock Bangladesh out of the T20 World Cup 2021.)  बिलालनं १८ धावांत ३, फय्याजनं ३० धावांत ३ आणि कलीमुल्लाहनं ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. 

Web Title: IPL 2021,  BAN v OMN : Bangladesh bowled out for 153 against Oman. Great bowling display by Oman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app