India vs South Africa, 1st T20I : कटकच्या बाराबती स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवला आहे. दव फॅक्टरमुळे भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना उभारलेली १७५ धावाही कमी पडतील, असे वाटत होते. पण हार्दिक पांड्याच्या धमाकेदार फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अवघ्या ७४ धावांत आटोपले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची टी-२० मधील ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. भारतीय संघाने १०१ धावांनी विजय नोंदवत दक्षिण आफ्रिकेला गुडघे टेकायला लावत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हार्दिक पांड्याची कडक अर्धशतकी खेळी
कटकच्या मैदानातील सामन्यात सूर्यकुमार यादवला नाणेफेकीच्या वेळी पुन्हा अपयश आले. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताच्या आघाडीचे फलंदाज स्वस्तात आटोपल्यावर भारतीय संघ दीडशेचा टप्पा गाठतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण दुखापतीतून सावरून कमबॅक करणाऱ्या हार्दिक पांड्या कटकच्या मैदानातील कडक अर्धशथकी खेळीसह संघाला दमदाह कमबॅक करून दिले. त्याने केलेल्या नाबाद ५९ धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं धावफलकावर १७५ धावा लावल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही.
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
अर्शदीपचा भेदक मारा अन् अक्षर पटेलसह वरुण चक्रवर्तीच्या फिरकीची जादू
भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डीकॉक आणि एडन मार्करम या जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात केली. अर्शदीप सिंगनं पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. ट्रिस्टन स्टब्सच्या रुपात अर्शदीप सिंगने १६ धावांवर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. अर्शदीप सिंगनंतर अक्षर पटेल याने कर्णधार मार्करमला क्लीन बोल्ड केले. डेविड मिलर हार्दिक पांड्याच्या जाळ्यात सापडला. वरुण चक्रवर्तीनं डोनोव्हन फरेराच्या रुपात या साम्नयात आपल्या खात्यात पहिली विकेट जमा केली.
अर्धा संघ ५० धावांच्या आत आटोपल्यावर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहची विक्रमी 'सेंच्युरी'
धावफलकावर ५० धावा असताना दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला होता. पण जसप्रीत बुमराहच्या खात्यात एकही विकेट आली नव्हती. वरुण चक्रवर्तीनं मार्को यान्सेनला तंबूत धाडल्यावर बुमरहा पिक्चरमध्ये आला. डेवाल्ड ब्रेविसला तंबूचा रस्ता दाखवत बुमराहनं आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये शंभर विकेटचा टप्पा पार केला. एवढ्यावरच न थांबता केशव महाराजच्या रुपात त्याने याच षटकात दुसरी विकेटही आपल्या खात्यात जमा केली. तिन्ही फॉरमॅटमध्ये शंभर विकेट्सचा डाव साधणारा जसप्रीत बुमराह हा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे.