IND vs NZ : न्यूझीलंडवरील ट्वेंटी-२० मालिका विजयानंतर रात्रभर सुरू होतं सेलिब्रेशन, पण टीम इंडियाचे ५ खेळाडू राहिले दूर, जाणून घ्या कारण

India vs New Zealand Test Series : भारतीय संघानं ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला. घरच्या मैदानावर न्यूझीलंडवर मिळवलेलं हे पहिलं निर्भेळ यश आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:53 AM2021-11-22T10:53:13+5:302021-11-22T10:54:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand Test Series : India celebrate clean sweep over new zealand in T20I series but 5 indian player not take part in party check why | IND vs NZ : न्यूझीलंडवरील ट्वेंटी-२० मालिका विजयानंतर रात्रभर सुरू होतं सेलिब्रेशन, पण टीम इंडियाचे ५ खेळाडू राहिले दूर, जाणून घ्या कारण

IND vs NZ : न्यूझीलंडवरील ट्वेंटी-२० मालिका विजयानंतर रात्रभर सुरू होतं सेलिब्रेशन, पण टीम इंडियाचे ५ खेळाडू राहिले दूर, जाणून घ्या कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand Test Series : भारतीय संघानं ट्वेंटी-२० मालिकेत न्यूझीलंडवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला. घरच्या मैदानावर न्यूझीलंडवर मिळवलेलं हे पहिलं निर्भेळ यश आहे. या यशासह न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर व आपल्या घरच्या मैदानावर क्लीन स्वीप देणाऱ्या पहिल्या संघाचा मान टीम इंडियानं पटकावला. भारतानं कोलकाता येथे खेळवलेल्या तिसऱ्या ट्वेंटी-२०त न्यूझीलंडवर ७३ धावांनी विजय मिळवला. हा न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेला भारताचा सर्वात मोठा विजय ठरला. या विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी रात्रभर जल्लोष केला, परंतु या पार्टीत ५ खेळाडू गैरहजर दिसले. या खेळाडूंनी जास्तवेळ पार्टीत सहभाग घेतला नाही आणि त्याचं कारण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यानं सांगितलं.

भारतीय संघ आता दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला भिडणार आहे. त्यामुळे पार्टीपासून दूर राहिलेले पाच खेळाडू हे कसोटी मालिकेतील सदस्य आहेत.  २५ नोव्हेंबरासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे या मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंना कानपूर गाठायचे आहे. त्यामुळेच या खेळाडूंनी अधिक काळ पार्टीत सहभाग घेतला नाही.  


आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर हे कसोटी संघातील सदस्य आहेत.  राहुल द्रविड म्हणाला की, आता आम्हाला कानपूरसाठी रवाना व्हायचे आहे आणि त्यासाठी सकाळी ७ वाजता खेळाडूंना तयार रहावं लागेल. त्यामुळे हे खेळाडू सोडून अन्य खेळाडू रात्रभर ट्वेंटी-२० मालिका विजयाचा जल्लोष करतील.   

  • पहिली कसोटी - २५ ते २९ नोव्हेंबर, कानपूर
  • दुसरी कसोटी - ३ ते ७ डिसेंबर, मुंबई
  • वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून

 

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद  सिराज, प्रसिद्ध कृष्णा ( India’s first Test Squad: Ajinkya Rahane (c), Cheteshwar Pujara (vc), KL Rahul, Mayank Agarwal, Shubman Gill, Shreyas Iyer, Wriddiman Saha (wk), KS Bharat (wk), Ravindra Jadeja, R Ashwin, Axar Patel, Jayant Yadav, Ishant Sharma, Umesh Yadav, Mohammed Siraj, Prasidh Krishna)

Web Title: India vs New Zealand Test Series : India celebrate clean sweep over new zealand in T20I series but 5 indian player not take part in party check why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.