India vs New Zealand Test Series : ट्वेंटी-२० मलिकेत निर्भेळ यश, आता खरी 'कसोटी'; रोहित, विराट, जसप्रीत शिवाय जागतिक स्पर्धेत टीम इंडिया मैदानावर उतरणार

India vs New Zealand Test Series : रोहित शर्माच्या फुलटाईम कर्णधारपदाच्या पहिल्याच मालिकेत टीम इंडियानं  ३-० अशा फरकानं न्यूझीलंडवर दणदणीत विजय साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 10:22 AM2021-11-22T10:22:48+5:302021-11-22T10:24:12+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 2021 Schedule: Test Match dates, timings, venue of all the matches of Ind vs NZ series | India vs New Zealand Test Series : ट्वेंटी-२० मलिकेत निर्भेळ यश, आता खरी 'कसोटी'; रोहित, विराट, जसप्रीत शिवाय जागतिक स्पर्धेत टीम इंडिया मैदानावर उतरणार

India vs New Zealand Test Series : ट्वेंटी-२० मलिकेत निर्भेळ यश, आता खरी 'कसोटी'; रोहित, विराट, जसप्रीत शिवाय जागतिक स्पर्धेत टीम इंडिया मैदानावर उतरणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand Test Series : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma)  फुलटाईम कर्णधारपदाच्या पहिल्याच मालिकेत टीम इंडियानं  ३-० अशा फरकानं न्यूझीलंडवर दणदणीत विजय साजरा केला. वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करताना आपली छाप सोडली. सूर्यकुमार यादव, इशान किशन, श्रेयस अय्यर यांनी सातत्य दाखवले नसले तरी ते संघात असल्यानं टीम मजबूत झाली होती.  लोकेश राहुल व रोहित चांगल्या फॉर्मात आहेत. पण, आता टीम इंडियाची खरी कसोटी लागणार आहे. रोहित, विराट कोहली, जसप्रीत बुमराह हे प्रमुख खेळाडू विश्रांतीवर असताना अजिंक्य रहाणे (  Ajinkya Rahane ) कसोटी मालिकेत न्यूझीलंडला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( WTC) टीम इंडियाची ही दुसरी कसोटी मालिका आहे.

न्यूझीलंड संघानं WTC Final मध्ये भारताला पराभूत करून जेतेपद नावावर केलं होतं आणि त्यानंतर हे दोन्ही संघ प्रथमच कसोटी मालिकेत एकमेकांसमोर येणार आहेत. भारताचे काही प्रमुख खेळाडू विश्रांतीवर गेले असले तरी घरच्या मैदानावर अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कडवं आव्हान देण्यास सज्ज आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यानंही ट्वेंटी-२० मालिकेनंतर कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे. केन विलियम्सन ( Kane Williamson) किवी संघात परतणार असल्यानं त्यांची बाजू आणखी भक्कम झाली आहे. 

न्यूझीलंडची कसोटी मालिकेत भारतातील कामगिरी - एकूण सामने - ३४, भारतानं जिंकले - १६ , न्यूझीलंडनं जिंकले- २, ड्रॉ - १६ 

जाणून घेऊया कसोटी मालिकेचं वेळापत्रक

  • पहिली कसोटी - २५ ते २९ नोव्हेंबर, कानपूर
  • दुसरी कसोटी - ३ ते ७ डिसेंबर, मुंबई
  • वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून

 

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद  सिराज, प्रसिद्ध कृष्णा ( India’s first Test Squad: Ajinkya Rahane (c), Cheteshwar Pujara (vc), KL Rahul, Mayank Agarwal, Shubman Gill, Shreyas Iyer, Wriddiman Saha (wk), KS Bharat (wk), Ravindra Jadeja, R Ashwin, Axar Patel, Jayant Yadav, Ishant Sharma, Umesh Yadav, Mohammed Siraj, Prasidh Krishna)

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान सहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा ( India’s second Test Squad: Virat Kohli (c) Ajinkya Rahane, Cheteshwar Pujara, KL Rahul, Mayank Agarwal, Shubman Gill, Shreyas Iyer, Wriddiman Saha (wk), KS Bharat (wk), Ravindra Jadeja, R Ashwin, Axar Patel, Jayant Yadav, Ishant Sharma, Umesh Yadav, Mohammed Siraj, Prasidh Krishna) 

न्यूझीलंडचा कसोटी संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, ग्लेन फिलिप्स, राचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविल, टीम साऊदी, रॉस टेलर, विल यंग, निल वॅगनर ( New Zealand’s Test Squad: Kane Williamson (c), Tom Blundell (wk), Kyle Jamieson, Tom Latham, Henry Nicholls, Ajaz Patel, Glenn Phillips, Rachin Ravindra, Mitchell Santner, Will Somerville, Tim Southee, Ross Taylor, Will Young, Neil Wagner) 
 

Web Title: India vs New Zealand 2021 Schedule: Test Match dates, timings, venue of all the matches of Ind vs NZ series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.