Hardik Pandya, India vs Ireland 1st T20I: हार्दिक पांड्या मैदानावर येताच झाली ६३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती, उम्रान मलिकचे पदार्पण

India vs Ireland 1st T20 I: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ( Hardik Pandya) गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात आयपीएल २०२२ जेतेपद पटकावून करिष्मा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 08:44 PM2022-06-26T20:44:18+5:302022-06-26T20:46:11+5:30

whatsapp join usJoin us
India vs Ireland 1st T20I : India for the first time in 63 years having 5 different captains in a calendar year, Umran Malik making his debut, India won the toss and decided to bowl first | Hardik Pandya, India vs Ireland 1st T20I: हार्दिक पांड्या मैदानावर येताच झाली ६३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती, उम्रान मलिकचे पदार्पण

Hardik Pandya, India vs Ireland 1st T20I: हार्दिक पांड्या मैदानावर येताच झाली ६३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती, उम्रान मलिकचे पदार्पण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Ireland 1st T20 I: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ( Hardik Pandya) गुजरात टायटन्सने पहिल्याच प्रयत्नात आयपीएल २०२२ जेतेपद पटकावून करिष्मा केला. आता त्याने टीम इंडियाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात ६३ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची पुनरावृत्ती केली. आयर्लंडविरुद्धच्या दोन  ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत हार्दिकच्या खांद्यावर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सामन्यात पाऊस व्यत्यय घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या सामन्यात उम्रान मलिकला ( Umran Malik) पदार्पणाची अखेर संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला पाचही सामन्यात बाकावर बसवून ठेवले होते. 
 


यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत ४ खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. हार्दिक पांड्या हा यंदाच्या वर्षात संघाचे नेतृत्व करणारा पाचवा कर्णधार असेल. असा योगायोग ६३ वर्षांपूर्वी घडला होता. १९५९ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व ५ खेळाडूंनी केले होते. हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, विनू मांकड, गुलाबभाई रामचंद आणि पंकज रॉय या पाच कर्णधारांनी एकाच वर्षी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर या वर्षी रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या हे पाच जण संघाचे कर्णधार होणार आहेत. 

दरम्यान, पावसामुळे सामना उशीरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण, लगेच ऊन आले अन् सामना सुरू झाला. परवेझ रसूलनंतर भारताकडून खेळणारा मलिक हा जम्मू-काश्मीरचा दुसरा खेळाडू ठरला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ( India won the toss and decided to bowl first.) 


भारताचे ट्वेंटी-२० संघाचे कर्णधार - वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, रोहित शर्मा, शिखर धवन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या  

भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल. उम्रान मलिक

Web Title: India vs Ireland 1st T20I : India for the first time in 63 years having 5 different captains in a calendar year, Umran Malik making his debut, India won the toss and decided to bowl first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.