India Squad for Sri Lanka W T20I Series : वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरनंतर भारतीय संघ पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात सज्ज आहे. २१ डिसेंबरपासून भारत-श्रीलंका महिला संघात टी-२० चा थरार पाहायला मिळणार आहे. घरच्या मैदानात रंगणाऱ्या ५ सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयनं भारतीय टी-२० संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघात स्मृती मानधना दिसणार का? हा एक मोठा प्रश्न होता. पण संघ घोषित झाल्यावर याचे उत्तर मिळाली आहे. स्मृती मानधना उप कर्णधाराच्या रुपात पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. याशिवाय दोन युवा खेळाडूंना मोठं सरप्राइज मिळालं आहे.
या दोन युवा खेळाडूंची पहिल्यांदाच टीम इंडियात वर्णी
भारतीय महिला संघाला अंडर १९ वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचणाऱ्या जी कमलिनी आणि वैष्णवी शर्मा या दोघींना पहिल्यांदाच वरिष्ठ संघात सामील करण्यात आले आहे. त्या १५ सदस्यीय भारतीय संघाचा भाग असतील. श्रीलंकेच्या दौऱ्यावर त्यांना पदार्पणाची संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा,जेमिमा रॉड्रिग्ज,शफाली वर्मा,हरलीन देओल, अमनजोत कौर,अरुंधती रेड्डी,क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, रिचा घोष (यष्टिरक्षक), जी. कमलिनी (यष्टिरक्षक),श्री चारणी, वैष्णवी शर्मा.
कधी अन् कुठं खेळवण्यात येणार टी-२० मालिकेतील सामने?
भारत-श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना २१ डिसेंबरला विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. २३ डिसेंबरला दोन्ही संघ याच मैदानात मालिकेतील दुसरा सामना खेळतील. त्यानंतर २६, २८ आणि ३० डिसेंबरला भारत-श्रीलंका यांच्यातील टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.