IND vs SA Paaji Run Kam Reh Gaye Arshdeep Singh's Hilarious Banter With Virat Kohli : विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यातील विजयासह भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-१ अशी खिशात घातली. या सामन्यात रनमशिन पुन्हा धडाडली. खणखणीत चौकारासह भारतीय संघालचा विजय निश्चित करणाऱ्या किंग कोहलीनं वनडेत सलग चौथ्या सामन्यात 'फिफ्टी प्लस'चा डाव साधला. तो ४५ चेंडूत ६५ धावांवर नाबाद राहिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीला शतकी हॅटट्रिकची संधी होती, पण...
तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत किंग कोहली शतकी हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर होता. पण तो फलंदाजीला मैदानात उतरला त्यावेळी भारतीय संघाला विजयासाठी ११६ धावांची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ठेवलेल्या २७० धावसंख्येचा पाठलाग करताना भारताच्या सलामी जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि अनुभवी रोहित शर्मा जोडी जमली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आणखी धावा केल्या असत्या तर किंग कोहलीची सेंच्युरी पक्की होती. अशी गोष्ट अर्शदीप सिंगनं थेट विराट कोहलीला बोलून दाखवली. यावर किंग कोहलीनं दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
विराट-अर्शदीपचा 'सेंच्युरी पे सेंच्युरी' व्हिडिओ व्हायरल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यातील विजयासह मालिका जिंकल्यावर अर्शदीप सिंगनं विशाखापट्टणमच्या मैदानातील किंग कोहलीसोबतचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात भारताचा जलदगती गोलंदाज स्टार बॅटरला म्हणतो की, "पाजी रन कम रह गए..सेंच्युरी पक्की थी वैसे.." यावर विराट कोहली टॉस जिंकला नाहीतर तुझीही सेंच्युरी पक्की होती, अशी मजेशीर कमेंट करताना दिसतो.
२ वर्षे आणि २० वनडे सामन्यानंतर टीम इंडियानं जिंकला टॉस
२०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाने सलग २० वनडे सामन्यात नाणेफेक गमावली. २१ व्या सामन्यात कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुल याने नाणेफेक जिंकली. यासाठी त्याने डाव्या हाताने नाणे उंचावण्याचा खेळही खेळला. टॉस जिंकल्यावर केएल राहुलसह टीम इंडियातील खेळाडूंची रिअॅक्शनही चर्चेचा विषय ठरली. हीच गोष्ट कोहलीच्या कमेंटमध्येही पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकली नसती तर दव फॅक्टरमुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अर्शदीपच्या १० षटकांच्या कोट्यात शंभर धावा कुटल्या असत्या अशा आशयाची कमेंट कोहलीनं केल्याचे पाहायला मिळाले.