IND vs SA 3rd T20I Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला रवाना होण्यापूर्वी भारत हरला ; रोहित शर्माचे क्लिन स्वीपचे स्वप्न भंगले

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेने उभा केलेला धावांचा डोंगर सर करताना भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 10:32 PM2022-10-04T22:32:10+5:302022-10-04T22:39:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 3rd T20I Live Updates : South Africa beat India by 50 runs in the 3rd T20, Rohit Sharma & co. won series by 2-1 | IND vs SA 3rd T20I Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला रवाना होण्यापूर्वी भारत हरला ; रोहित शर्माचे क्लिन स्वीपचे स्वप्न भंगले

IND vs SA 3rd T20I Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला रवाना होण्यापूर्वी भारत हरला ; रोहित शर्माचे क्लिन स्वीपचे स्वप्न भंगले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Afrida 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेने उभा केलेला धावांचा डोंगर सर करताना भारताला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांनी धावांचा वेग वाढवला, परंतु त्यांनाही मोठी खेळी करण्यापासून आफ्रिकेच्या गोलंदाजांनी रोखले. विराट कोहली व लोकेश राहुल यांच्या अनुपस्थितीत भारताच्या फलंदाजांच्या फळीने नांगी टाकली अन् रोहित शर्माचे क्लिन स्वीपचे स्वप्न अपुरे राहिले. आफ्रिकेने अखेरचा सामना जिंकून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आत्मविश्वास कमावला. 

दिनेश कार्तिकच्या ८ चेंडूंत ४० धावा! पण त्रिस्तान स्टब्सच्या कॅचने केली हवा; भारत 6 बाद 108 धावा

कागिसो रबाडाने पहिल्याच षटकार रोहित शर्माचा ( ०) त्रिफळा उडवला. त्यानंतर वेन पार्नेलने अप्रतिम चेंडूवर श्रेयस अय्यरला ( १) LBW केले. २ बाद ४ अशा धावांवरून रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांनी भारताला सावरले. लुंगी एनगिडीने टाकलेल्या पाचव्या षटकात रिषभने ४, ०, ६, ४, ६ अशा २० धावा चोपल्या, परंतु अखेरच्या चेंडूवर तो स्टब्सच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रिषभने १४ चेंडूंत २७ धावा केल्या. त्यानंतर पुढील षटकात कार्तिकने ६,४,६ अशी आतषबाजी करताना १९ धावा कुटल्या.  कार्तिकने केशव महाराजने टाकलेल्या सातव्या षटकात सलग दोन षटकार खेचले, परंतु महाराजने त्याचा त्रिफळा उडवला. कार्तिक २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावा करून माघारी परतला. फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवचा ८ धावेवर स्टब्सने अफलातून झेल टिपला अन् भारताचा निम्मा संघ ८६ धावांत माघारी परतला. 

त्यानंतर हर्षल पटेल ( १७), अक्षर पटेल (  ९) व आर अश्विन ( २) हेही झटपट माघारी परतल्याने भारताची अवस्था ८ बाद १२० धावा अशी झाली होती. भारताचा पराभव समोर दिसत असताना दीपक चहरने दमदार फटके मारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३१ धावांची खेळी केली.  

उमेश यादवसह त्याने२६ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी केली. भारताचा डाव १८.३ षटकांत १७८ धावांत गडगडला. आफ्रिकेने ४९ धावांनी सामना जिंकला. 
 

डाव्यांचा खेळ अन्... 

क्विंटन डी कॉक, रिले रोसोवू आणि डेव्हिड मिलर या डावखुऱ्या फलंदाजांनी धुमाकूळ घातला. क्विंटनला शून्यावर जीवदान देणे खूप महाग पडले. रोसोवूने ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. २०व्या षटकात फलंदाजीला आलेल्या मिलरने सलग तीन षटकार खेचून आफ्रिकेला ३ बाद २२७ धावांपर्यंत पोहोचवले. कर्णधार टेम्बा बवुमा ( ३) पुन्हा अपयशी ठरला. क्विंटन व रोसोवू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या. क्विंटन ४३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावांवर रन आऊट झाला. रोसोवू व त्रिस्तान स्टब्स ( २३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. रोसोवू ४८ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावांवर नाबाद राहिला, तर मिलरने ५ चेंडूंत १९ धावा कुटल्या. 
 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: IND vs SA 3rd T20I Live Updates : South Africa beat India by 50 runs in the 3rd T20, Rohit Sharma & co. won series by 2-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.