Join us
Daily Top 2Weekly Top 5

SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट

पहिल्या चार सामन्यात तो धावांसाठी संघर्ष करताना दिसला, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:56 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi Century In Syed Mushtaq Ali Trophy 2025 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-२० स्पर्धेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची बॅट अखेर तळपली आहे. पहिल्या चार सामन्यातील फ्लॉप शोनंतर वैभव सूर्यवंशी याने महाराष्ट्र संघाविरुद्धच्या लढतीत आणखी एक विक्रमी शतक झळकावले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील पहिले शतक झळकावत त्याने खास वर्ल्ड रेकॉर्डही सेट केला आहे. वयाच्या १४ व्या वर्षी १७ व्या टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून तिसरी सेंच्युरी आली आहे. असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला अन् एकमेव युवा फलंदाज ठरला आहे. 

 वैभवचा धमाका! १७७.०५ च्या स्ट्राइक रेटसह नाबाद १०८ धावांची खेळी

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील एलिट ग्रुप बीमधील बिहार विरुद्ध महाराष्ट्र यांच्यातील सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगल्याचे पहायला मिळाले. या सामन्यात महाराष्ट्र संघाचा कर्णधार पृथ्वी शॉनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. बिहारच्या डावाची सुरुवात करताना पहिल्या चार सामन्यात सपशेल अवयशी ठलेल्या वैभव सूर्यवंशीनं धमाकेदार फलंदाजी करत या स्पर्धेतील पहिले वहिले शतक झळकावले. बिहारच्या डावाची सुरुवात करताना त्याने ६१ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १७७.०५ च्या स्ट्राइक रेटसह नाबाद १०८ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर बिहार संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यातत १७६ धावा केल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : SMAT 2025: 14-Year-Old Vaibhav Suryavanshi Hits Record Century!

Web Summary : Vaibhav Suryavanshi, 14, shines in Syed Mushtaq Ali Trophy 2025, scoring a record-breaking century against Maharashtra. This is his first century in the tournament and third in T20s, making him the youngest to achieve this feat.
टॅग्स :वैभव सूर्यवंशीटी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय