India vs South Africa, 1st Test : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात शुभमन गिल टॉस वेळी पुन्हा अनलकी ठरला आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमानं टॉस जिंकत भारतीय मैदानात टॉस गमावण्याचा सिलसिला संपवला आहे. २०१५ नंतर ७ वेळा टॉस गमावल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं अखेर टॉसवेळी बाजी मारल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत टाळला टीम इंडियासोबत बरोबरीचा नकोसा विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा विक्रम हा इंग्लंडच्या नावे आहे. १९६१-७३ या कालावधी इंग्लंडच्या संघाने ११ वेळा टॉस गमावल्याचा रेकॉर्ड आहे. या यादीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. १९३४ -५१ या कालावधीत भारतीय संघाने सलग ८ वेळा टॉस गमावला असून दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. २०१५-१९ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेनं सलग ७ वेळा टॉस गमावला होता. कोलकाताच्या मैदानातील कसोटीत टॉस जिंकत दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघाच्या सलग टॉस गमावण्याच्या नकोशा विक्रमाची बरोबरी टाळली आहे.
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
भारतीय संघात बदलाचा प्रयोग, साई सुदर्शनला बसवलं बाकावर
भारतीय संघाने कोलकाता कसोटी सामन्यात मोठा बदल केल्याचे पाहायला मिळाले. चार फिरकीपटू खेळवण्याचा डाव खेळताना साई सुदर्शनवर बाकावर बसवण्यात आले आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला पसंती मिळाली आहे. वॉशिंग्टन सुंदरशिवाय रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या तिघांना भारतीय संघात संधी मिळाली आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन
एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, कायल वेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज.