Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA : सूर्यानं भरवसा दाखवला नाही! मॅचनंतर पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही! कारण...

कॅप्टन सूर्यानं पॉवरप्लेमध्ये नाही दाखवला भरवसा! मॅचनंतर यावर काय म्हणाला पांड्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 01:01 IST

Open in App

भारतीय संघाने कटक येथील बाराबती स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात १०१ धावांनी धमाकेदार विजय नोंदवत टी-२० क्रिकेटमधील आपली बादशाहत दाखवून दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या विजयात हार्दिक पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत मोलाचा वाटा उचलला. पहिल्यांदा फलंदाजी करताना संघ अडचणीत असताना त्याने कमालीची फलंदाजी केली. पुनरागमनाच्या सामन्यात त्याच्या भात्यातून आलेली खेळी ही प्रक्षेकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी आणि भारतीय संघाच्या विजयाचा पाया भक्कम करणारी ठरली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दमदार कमबॅकसह हार्दिक पांड्या ठरला सामनावीर

भारतीय संघाची अवस्था ४ बाद ७८ धावा अशी झाली असताना फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकापर्यंत नाबाद राहून २८ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली. गोलंदाजीवेळी २ षटकात त्याने १६ धावा खर्च करत डेविड मिलरच्या रुपात एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. या कामगिरीच्या जोरावर त्याने सामनावीर पुरस्कार पटकला.

IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले...

ताकदीपेक्षा टायमिंगवर भर

सामन्यानंतर कठीण परिस्थितीत केलेल्या खेळीबद्दल हार्दिक पांड्या म्हणाला की, विकेट्स गोलंदाजीसाठी अनुकूल होती हे माझ्या लगेच लक्षात आले. मी माझ्या फटक्यावर नियंत्रण ठेवण्यावर भरवसा दाखवला. या खेळपट्टीलक चेंडू ताकदीनं मारण्यापेक्षा टायमिंगचा वापर करणं गरजेचे होते. त्याच पद्धतीने मी फलंदाजी केली आणि खेळीबद्दल समाधानी आहे.

कॅप्टन सूर्यानं पॉवरप्लेमध्ये नाही दाखवला भरवसा! मॅचनंतर पांड्या म्हणाला...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ टी-२० सामन्यात पहिल्यांदाच अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह या दोघांसह मैदानात उतरला होता. सूर्यकुमार यादवनं पॉवर प्लेमध्ये या दोघांकडून प्रत्येकी दोन-दोन षटके टाकून घेतल्यावर चेंडू वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलच्या हाती सोपवल्याचे पाहायला मिळाले. कर्णधाराचा हा निर्णय पॉवर प्लेमध्ये पांड्यावर भरवसा न दाखवल्यासारखा होता. यासंदर्भात पांड्याला प्रश्नही विचारण्यात आला. यावर हार्दिक पांड्या म्हणाला की,"एक क्रिकेटपटू म्हणून माझी सामन्यातील भूमिका काय?  याची कधीच चिंता करत नाही. हार्दिक पांड्याला काय वाटते? याने काहीच फरक पडत नाही, यावर जोर देत मी स्वत:पेक्षा टीम इंडियाला काय गरजेचे आहे त्याचा विचार करतो. माझ्यासाठी सर्वात आधी संघ आहे. हाच माझी जमेची बाजू आहे, असे वाटते."  

English
हिंदी सारांश
Web Title : Hardik Pandya: All you need to know in 10 words

Web Summary : Hardik Pandya's name repeatedly mentioned, highlighting his significance in cricket circles. He is a prominent figure.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादव