Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SA 1st T20I Live Streaming : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० चा थरार! सामना कुठे आणि कसा पाहाल?

आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:12 IST

Open in App

IND vs SA 1st T20I Live Streaming : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये रंगणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत याच दोन संघात जेतेपदासाठीची रंगत पाहायला मिळाली होती. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका अधिक रोमहर्षक रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. इथं एक नजर टाकूयात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठं आणि कसं पाहता येईल याबाबतची सविस्तर माहिती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!टेलिव्हिजनवर हा सामना कुठे पाहता येईल?

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या प्रेक्षपणाचे हक्क Star Sports Network कडे आहेत. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या भाषेतील चॅनेलवर पाहायला मिळेल.  

भारताचा विश्वचषकाच्या तयारीवर भर; द. आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका आजपासून रंगणार

ऑनलाइन लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहाल?  ऑनलाइन प्रेक्षकांसाठी JioHotstar अ‍ॅप आणि वेबसाइट वर संपूर्ण मालिकेचे थेट प्रसारण दाखवले जाणार आहे. मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि वेब ब्राउझरवर तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा आनंद घेऊ शकता.

IND vs SA 1st T20I किती वाजता सुरू होईल?

पहिला टी२० सामना मंगळवारी, ९ डिसेंबर रोजी खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजता या सामन्यातील पहिला चेंडू फेकला जाईल. अर्धातास अगोदार दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.

 सामना कुठे खेळला जाणार आहे?

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर कटक (ओडिशा) येथे खेळला जाईल.

T20I मालिकेसाठी भारताचा संघ  

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (wk), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.T20I  मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

एडन मार्करम (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, रिझा हेंड्रिक्स, टोनी डे झोरझी, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, मार्को जान्सन, क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), डोनावन फेरेरा (यष्टीरक्षक), लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, केशव महाराज, क्वेन माफाक्का, कॉर्बिन बॉश, ऑटनियल बर्टमन.

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs SA T20I: Where and how to watch live?

Web Summary : India faces South Africa in the 1st T20I. Crucial for T20 World Cup prep, it will be broadcast on Star Sports and JioHotstar. Match starts 7 PM IST in Cuttack.
टॅग्स :दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकासूर्यकुमार यादवशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ