IND vs NZ, 2nd Test Live Update : मुंबई कसोटीत नोंदवला गेला असा विक्रम जो १३३ वर्षांत कधीच झाला नव्हता; जाणून घ्या काय

India vs New Zealand, 2nd Test Live Update : विराट कोहलीनं ( Virat Kohli) पुनरागमनाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:35 PM2021-12-03T13:35:16+5:302021-12-03T13:35:55+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd Test Live Update : This is only the second time in Test history that four captains have been used in a two-match series | IND vs NZ, 2nd Test Live Update : मुंबई कसोटीत नोंदवला गेला असा विक्रम जो १३३ वर्षांत कधीच झाला नव्हता; जाणून घ्या काय

IND vs NZ, 2nd Test Live Update : मुंबई कसोटीत नोंदवला गेला असा विक्रम जो १३३ वर्षांत कधीच झाला नव्हता; जाणून घ्या काय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd Test Live Update : विराट कोहलीनं ( Virat Kohli) पुनरागमनाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत मागील दोन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या खेळीमुळे भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ १२ वाजता सुरू झाला. मयांक अग्रवाल व शुबमन गिल यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा संयमानं सामना करताना अर्धशतकी भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. भारतीय संघात तीन, तर किवी संघात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला आहे. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात आज असा विक्रम नोंदवला गेला, जो १३३ वर्षांत कधीच नोंदवला गेलेला नाही. त्यामुळे या सामन्याची क्रिकेट इतिहासात एका वेगळ्या विक्रमानं नोंद झाली आहे. 


आजच्या सामन्यात  टीम इंडियाच्या ताफ्यातून अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane), इशांत शर्मा ( Ishant Sharma) व रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. भारतीय संघात तीन बदल पाहायला मिळाले. अजिंक्यच्या जागी विराट कोहली, इशांतच्या जागी मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजाच्या जागी जयंत यादव याची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली. 

१८८८-८९ नंतर थेट २०२१-२२... झाला भारी विक्रम!
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चार वेगवेगळे कर्णधार असल्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी दक्षिण आफ्रिकेत १८८८-८९ मध्ये झालेल्या पहिल्या कसोटी मालिकेत चार वेगवेगळ्या खेळाडूंनी संघाचे नेतृत्व सांभाळले होते. दक्षिण आफ्रिकेकडून ओवेन डनेल व विलियम मिल्टन यांनी, तर इंग्लंडकडून सी आयूब्रेय स्मिथ व माँटी बावडन यांनी  कर्णधाराची भूमिका पार पाडली होती. 


त्यानंतर भारत-न्यूझीलंड मालिकेत हा विक्रम झाला. पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे व केन विलियम्सन कर्णधार होते, तर आजच्या सामन्यात विराट कोहली व टॉम लॅथम हे कर्णधार आहेत. 
 

Web Title: IND vs NZ, 2nd Test Live Update : This is only the second time in Test history that four captains have been used in a two-match series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.