IND vs NZ, 2nd Test Live Update : एजाझ पटेलनं दहा विकेटससाठी दीड दिवस घेतले, भारतीय गोलंदाजांनी अडीच तासात किवींना गुंडाळले 

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस हा गोलंदाजांनी गाजवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 03:43 PM2021-12-04T15:43:03+5:302021-12-04T15:47:04+5:30

whatsapp join usJoin us
IND vs NZ, 2nd Test Live Update : New Zealand bowled out for 62, Their lowest ever total in the history of Test cricket against an Asian side  | IND vs NZ, 2nd Test Live Update : एजाझ पटेलनं दहा विकेटससाठी दीड दिवस घेतले, भारतीय गोलंदाजांनी अडीच तासात किवींना गुंडाळले 

IND vs NZ, 2nd Test Live Update : एजाझ पटेलनं दहा विकेटससाठी दीड दिवस घेतले, भारतीय गोलंदाजांनी अडीच तासात किवींना गुंडाळले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस हा गोलंदाजांनी गाजवला. एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) यानं १० विकेट्स घेत विश्वविक्रमाची नोंद केली आणि भारताला पहिल्या डावात ३२५ धावांवर समाधान मानावे लागले. मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal )चे दीडशतक व अक्षर पटेलच्या अर्धशतकांनी भारताचा डाव सावरला. मुंबईच्या खेळपट्टीवर एजाझचा करिष्मा चालला तिथे भारतीय गोलंदाज चमकणार नाही, असे कसं होईल. मोहम्मद सिराजनं सुरुवातीला जबरदस्त धक्के दिले आणि नंतर फिरकीपटू त्याला जॉईन झाले. आर अश्विननं चार विकेट्स घेत किवींचा पहिला डाव सहज गुंडाळला. टीम इंडियानं फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला.

४ बाद २२१ वरून भारतानं आज डावाची सुरूवात केली. परंतु दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात एजाझनं सहाला ( २७) पायचीत केलं अन् पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केलं. अक्षर व  मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला.  मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर एजाझच्या गोलंदाजीवर माघारी परतला.  अक्षरनं ११३ चेंडूंत कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाझनं पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत केले. त्यानंतर जयंत यादव व मोहम्मद सिराज यांची विकेट घेत एजाझनं इतिहास रचला.  भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला.   एजाझनं ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यानं १२ निर्धाव षटकंही फेकली. 

केन विलियम्सनची उणीव न्यूझीलंडला प्रकर्षानं जाणवली. इशांत शर्माच्या जागी संघात स्थान पटकावलेल्या मोहम्मद सिराजनं पहिल्या स्पेलमध्ये ४ षटकांत १९ धावा देताना तीन विकेट्स घेतल्या. विल यंग, टॉम लॅथम व रॉस टेलर हे आघाडीचे फलंदाज माघारी पाठवून सिराजनं टीम इंडियासाठी विजयाचे दार उघडले. त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली. अक्षर पटेल व जयंत यादव धक्के देतच होते, परंतु अनुभव आर अश्विननं किवी फलंदाजांना गुंडाळले. किवींचा निम्मा संघ ३१ धावांवर माघारी परतला होता. त्यात अश्विनच्या दणक्यानं त्यांची अवस्था आणखी बिकट केली. फॉलोऑन टाळण्याची किवी फलंदाजांची धडपड पाहायला मिळाली. अश्विननं चार विकेट्स घेतल्या. किवींचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. आशियाई देशाविरुद्ध किवींची ही निचांक कामगिरी ठरली. भारतानं पहिल्या डावात २६३ धावांची आघाडी घेतली. 

आर अश्विननं ८ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजनं १९ धावांत ३, तर अक्षर पटेलनं १४ धावांत २ बळी टिपले. जयंत यादवनं एक विकेट घेतली.

भारतातील कसोटी सामन्यातील निचांक कामगिरी

६२, न्यूझीलंड वि. भारत, २०२१

७५, भारत वि. वेस्ट इंडिज, १९८७

७६, भारत वि. दक्षिण आफ्रिका, २००८

७९, दक्षिण आफ्रिका वि, भारत, २०१५ 

Web Title: IND vs NZ, 2nd Test Live Update : New Zealand bowled out for 62, Their lowest ever total in the history of Test cricket against an Asian side 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.