T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: रोहित शर्मा- लोकेश राहुलनं मोडला १४ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम, भारतानं या वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला

ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या भारतीय सलामीवीरांनी आज अफगाणिस्तानविरूद्ध जोरदार फटाके फोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 09:22 PM2021-11-03T21:22:16+5:302021-11-03T21:23:32+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Ind vs Afg Live updates : KL Rahul-Rohit Sharma break recordIndia becomes the first team to score 200+ runs in this World Cup, India posted 210 for 2 | T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: रोहित शर्मा- लोकेश राहुलनं मोडला १४ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम, भारतानं या वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला

T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: रोहित शर्मा- लोकेश राहुलनं मोडला १४ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम, भारतानं या वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि लोकेश राहुल ( KL Rahul) या भारतीय सलामीवीरांनी आज अफगाणिस्तानविरूद्ध जोरदार फटाके फोडले. २००७नंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय सलामीवीरांना आज शतकी भागीदारी करता आली. रोहित-लोकेश या जोडीनं हा पराक्रम केला. या जोडीनं आज अफगाणिस्तानच्या कोणत्याच गोलंदाजाला जुमानले नाही. येणारा प्रत्येक चेंडू ही दोघं सहजतेनं सीमापार टोलवत होते. यांनी पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला अन् टीम इंडियानं अफगाणिस्तानसमोर तगडं आव्हान उभं केलं. ( सामन्याचे संपूर्ण धावफलक पाहण्यासाठी क्लिक करा

अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याला पुन्हा संधी दिली गेली, तर इशान किशनच्या जागी सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झालं आणि वरुण चक्रवर्थी दुखापतग्रस्त झाल्यानं आर अश्विनची ४ वर्षांनंतर ट्वेंटी-२० संघात एन्ट्री झाली. रोहित व लोकेश या जोडीला सलामीला पाहून भारतीय चाहते सुखावले. रोहित शर्माला ( Rohit Sharma) पुन्हा ओपनिंगला त्याच्या जून्याच स्टाईलमध्ये पाहून चाहते सुखावले. लोकेश राहुलनंही ( KL Rahul) त्याला चांगली साथ देताना पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी केली.  T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches

रोहित व लोकेश यांनी आज निराश नाही केलं. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ५३ धावा कुटल्या. रोहितनं ५व्या षटकात नवीन उल हकच्या गोलंदाजीवर १७ धावा चोपल्या. पाचव्या चेंडूवर रोहितनं स्ट्रेट षटकार खेचला अन् तो टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये गेला. डगआऊटमध्ये बसलेल्या विराटच्या हातात तो चेंडू गेला. या जोडीनं  १० षटकांत ८६ धावा जोडल्या. रोहितनं ३७ चेंडूंत ट्वेंटी-२० सामन्यातील ३३वे अर्धशतक पूर्ण केलं. लोकेशनं पुढच्या चेंडूवर षटकार खेचून पहिल्या विकेटसाठी रोहितसह शतकी भागीदारी पूर्ण केली. रोहित व लोकेश यांची ट्वेंटी-२०तील ही चौथी शतकी भागीदारी ठरली. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग यांनी इंग्लंडविरुद्ध शतकी भागीदारी केली होती. त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये शतकी भागीदारी करणारी रोहित-लोकेश ही भारताची पहिलीच सलामीवीरांची जोडी ठरली. T20 World Cup 2021 live updates, T20 World Cup 2021 schedule,  T20 World Cup 2021 live matches

लोकेशनंही ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी १४० धावांची भागीदारी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील एक विक्रम मोडला. भारताकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी गंभीर व सेहवाग यांनी इंग्लंडविरुद्ध १३६ धावांची भागीदारी केली होती.  रोहित ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकार खेचून ७४ धावांवर माघारी परतला. विराट कोहलीनं रिषभ पंत व हार्दिक पांड्याला प्रमोशन देत पुढे पाठवले. लोकेश ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा करून माघारी परतला. रिषभनं १३ चेंडूंत २७ ( १ चौकार व ३ षटकार) धावा केल्या, तर हार्दिकनं १३ चेंडूंत ३५ ( ४ चौकार व २ षटकार) धावा करताना टीम इंडियाला २ बाद २१० धावांचा पल्ला गाठून दिला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये २००+ धावा करणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. Ind vs Afg live match, Ind vs Afg latest  score, Ind vs Afg T20 World cup match

Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs Afg Live updates : KL Rahul-Rohit Sharma break recordIndia becomes the first team to score 200+ runs in this World Cup, India posted 210 for 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.