ICC Spirit of Cricket Award: खेळभावनेला ICC'चा सलाम! नेपाळच्या खेळाडूने जिंकला 'ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार'

आयसीसी (ICC) गेल्या काही दिवसापासून 2022 मध्ये उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देत आहे. टीम इंडियाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यालाही बेस्ट क्रिकेटरचा अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 01:49 PM2023-01-27T13:49:08+5:302023-01-27T13:49:38+5:30

whatsapp join usJoin us
icc awards nepals aasif sheikh won 2022 icc spirit cricket award inspiring moment during t20 match | ICC Spirit of Cricket Award: खेळभावनेला ICC'चा सलाम! नेपाळच्या खेळाडूने जिंकला 'ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार'

ICC Spirit of Cricket Award: खेळभावनेला ICC'चा सलाम! नेपाळच्या खेळाडूने जिंकला 'ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Spirit of Cricket Award : आयसीसी (ICC) गेल्या काही दिवसापासून 2022 मध्ये उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देत आहे. टीम इंडियाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यालाही बेस्ट क्रिकेटरचा अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यालाही आयसीसीने 'वन डे क्रिकेटर ऑफ द इयर' हा अॅवार्ड देऊन सन्मानित केले.  भारतीय टीमचा मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर यांचाही समावेश होता. आता आयसीसीने आणखी एक अॅवार्ड जाहीर केला आहे. क्रिकेटच्या मैदानावरील खेळाची भावना जपण्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.

गेल्या वर्षी आयर्लंड आणि नेपाळ यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात खेळभावनेचा एक क्षण घडला आहे. या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. या सामन्यात गोलंदाजाने रन घेत असलेल्या खेळाडूला धक्का देऊन खाली पाडले. यानंतर त्याने लगेच चेंडू उचलला आणि यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकला. फलंदाजाने उठून धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण तो खूप मागे राहिला, तोपर्यंत तो चेंडू  यष्टिरक्षक आसिफ शेखच्या हाती गेला होता, पण क्रिकेटर शेखने स्पिरिट दाखवत त्याला धावबाद केले नाही.

MS Dhoni Movie: Lets Get Married सिनेमाने होणार धोनीच्या 'नव्या इनिंग'ची सुरूवात, अभिनेत्रीही ठरली!

हा सामना गेल्या वर्षी ओमानमध्ये झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 षटकात 127 धावा केल्या. आयर्लंडकडून जॉर्ज डॉकरेलने सर्वाधिक 28 धावा केल्या. 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळचा संघ केवळ 111 धावाच करू शकला आणि 16 धावांनी सामना गमावला. संदीप लामिछानेने 26 धावा देत 1 बळी तर दीपेंद्र सिंगने 21 धावा देत 4 बळी घेतले. या सामन्यात आसिफ शेखने 22 चेंडूत 23 धावांची खेळी केली.

Web Title: icc awards nepals aasif sheikh won 2022 icc spirit cricket award inspiring moment during t20 match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.