"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला

Hardik Pandya Angry on paparazzi over Mahieka Sharma viral video: माहिका शर्माचा पापाराझीने विचित्र अँगलने शूट केल्याने हार्दिक पांड्याची सटकली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:29 IST2025-12-09T15:52:10+5:302025-12-09T16:29:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
hardik pandya angry blasts paparazzi over mahieka sharma viral video private moment turned cheap sensationalism | "हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला

"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला

Hardik Pandya Angry on paparazzi over Mahieka Sharma viral video: टीम इंडियाचा सुपरस्टार क्रिकेटर अष्टपैलू हार्दिक पांड्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असतो. हार्दिकचा घटस्फोट झाल्यानंतर त्याचे नाव जास्मिन वालियाशी जोडण्यात आले. त्यानंतर आता माहिका शर्मा त्याची गर्लफ्रेंड असल्याचे जवळपास निश्चित आहे. ते दोघेही अनेकदा डेटवर गेलेलेही दिसले आहेत. तशातच मंगळवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून परत येत असताना माहिका शर्मा हिला पापाराझीने घेरले. माहिका एकटीच होती. त्यामुळे हार्दिकला ही गोष्ट रुचली नाही. cheap sensationalism याच मुद्द्यावरून त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

हार्दिक पांड्याने गोपनीयता आणि वैयक्तिक आयुष्यातील मर्यादा यांची आठवण पापाराझीला करून दिली. तसेच, प्रसारमाध्यमांनीही जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक विधान फोटो शेअर केला. त्याने लिहिलेल्या नोटमध्ये शेलक्या शब्दांत पापाराझीवर टीका केली. एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी उगाच सनसनाटी बनवण्याच्या पापाराझीच्या प्रयत्न चुकीचा असल्याचे त्याने म्हटले.

या व्हिडीओमुळे हार्दिक नाराज

हार्दिकने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, "मला माहित आहे की सेलिब्रिटींचे जीवन सार्वजनिक पद्धतीने चर्चेत असते. अशा लोकांकडे खूप लक्ष वेधले जाते. पण कधीकधी मर्यादा ओलांडली जाते. आजही असेच काहीतरी घडले जे मर्यादा ओलांडल्यासारखे होते. माहिका वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये पायऱ्या उतरत असताना पापाराझीने तिला अशा अँगलने क्लिक केले, ज्याप्रकारे तिचे फोटो काढणे किंवा व्हिडीओ शूट करणे योग्य नव्हते. महिलेचे अशा प्रकारे फोटो काढणे आणि ते उगाच व्हायरल करणे हा फारच विचित्र प्रकार आहे. अशी विकृत मानसिकतेता फारच चुकीची आहे."

हार्दिकने पुढे लिहिले, "हा व्हिडीओ कुणी शूट केला किंवा कशाप्रकारे केले याबद्दल मला अधिक बोलायचे नाही. पण महिलांचा आणि सर्वांचा मूलभूत आदर राखला जायला हवा. प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळायला हव्यात. दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या मीडिया बांधवांचा मी आदर करतो आणि तुम्हाला नेहमीच सहकार्य करतो. पण मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, कृपया शूट किंवा फोटो काढताना थोडा विचार करत जा. सर्वकाही टिपण्याची गरज नाही. प्रत्येक अँगलमधूनच फोटो काढण्याची गरज नाही. या थोडी माणुसकी जपूया. धन्यवाद."

माहिका शर्मा कोण आहे?

माहिका शर्मा ही मूळची दिल्लीची आहे आणि तिने मॉडेलिंगच्या जगतात स्वतःचे नाव कमावले आहे. माहिकाकडे अर्थशास्त्र आणि वित्त या विषयात पदवी आहे. ती मॉडेलिंग करते आणि सध्या हार्दिकसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत.

Web Title : माहिका शर्मा के वीडियो पर हार्दिक पांड्या पैपराज़ी पर भड़के

Web Summary : माहिका शर्मा की वीडियो को लेकर हार्दिक पांड्या पैपराज़ी पर गुस्सा हुए। उन्होंने गोपनीयता के उल्लंघन की आलोचना की और मीडिया से महिलाओं के प्रति सम्मान बनाए रखने का आग्रह किया। उन्होंने निजता और सीमाओं का सम्मान करने की बात कही।

Web Title : Hardik Pandya angered by paparazzi's intrusive video of Mahieka Sharma.

Web Summary : Hardik Pandya expressed anger at paparazzi for inappropriately filming Mahieka Sharma. He criticized the sensationalism and invasion of privacy, urging media to respect boundaries and privacy. Pandya emphasized the need for basic respect towards women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.