Shami MS Dhoni Video, IPL 2022 GT vs CSK: 'ग्रेट फिनिशर' महेंद्रसिंग धोनीला मोहम्मद शमीने सहज केलं गप्प! सापळा रचून काढली विकेट

धोनीने केल्या १० चेंडूत ७ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 06:51 PM2022-05-15T18:51:41+5:302022-05-15T18:52:32+5:30

whatsapp join usJoin us
Finisher MS Dhoni Failed to end CSK Innings on high note as Mohammad Shami trapped him IPL 2022 GT vs CSK | Shami MS Dhoni Video, IPL 2022 GT vs CSK: 'ग्रेट फिनिशर' महेंद्रसिंग धोनीला मोहम्मद शमीने सहज केलं गप्प! सापळा रचून काढली विकेट

Shami MS Dhoni Video, IPL 2022 GT vs CSK: 'ग्रेट फिनिशर' महेंद्रसिंग धोनीला मोहम्मद शमीने सहज केलं गप्प! सापळा रचून काढली विकेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS Dhoni Shami Video, IPL 2022 CSK vs GT: गुजरात टायटन्सच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत केवळ ५ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. ऋतुराज गायकवाडने डाव सावरण्यासाठी ४४ चेंडूत अर्धशतक ठोकलं. जगदीशननेही ३९ धावांची नाबाद खेळी केली. पण कोणत्याही फलंदाजाने फटकेबाजी न केल्याने CSK ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मोहम्मद शमीने ४ षटकांत केवळ १९ धावा देत सर्वाधिक २ बळी टिपले. मुख्य म्हणजे, ग्रेट फिनिशर असं बिरून मिरवणाऱ्या धोनीला शमीने सहज गप्प केलं अन् माघारी धाडलं.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉनवे ५ धावांत माघारी परतला. मोईन अलीने २१ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने ५३ धावांची शानदार खेळी केली. शिवम दुबे शून्यावर माघारी गेला. त्यामुळे साऱ्यांच्या धोनीकडून अपेक्षा होत्या. शेवटच्या षटकात धोनी मोठी फटकेबाजी करेल असं वाटत होतं. पण शमीने योग्य सापळा रचला. त्याने धोनीला हाफ पिच चेंडू टाकला आणि एक खेळाडू ३० यार्ड सर्कलमध्ये ठेवला. धोनीला ती संधी वाटल्याने त्याने फटका मारला आणि तो थेट यश दयालच्या हातात झेल देऊन बसला. पाहा Video-

दरम्यान, जगदीशनने मात्र शेवटपर्यंत किल्ला लढवत संघाला १३० पार पोहोचवले. त्याने ३३ चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या.

Web Title: Finisher MS Dhoni Failed to end CSK Innings on high note as Mohammad Shami trapped him IPL 2022 GT vs CSK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.