Prithvi Shaw IPL 2022 : पृथ्वी शॉ मैदानावर कधी कमबॅक करणार?; मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी दिले धक्कादायक अपडेट्स

दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष सुरू असताना त्यांचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याच्यावर  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 09:40 PM2022-05-11T21:40:50+5:302022-05-11T21:41:41+5:30

whatsapp join usJoin us
DC head coach Ricky Ponting did reveal that the young opener Prithvi Shaw had been ruled out of IPL 2022 | Prithvi Shaw IPL 2022 : पृथ्वी शॉ मैदानावर कधी कमबॅक करणार?; मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी दिले धक्कादायक अपडेट्स

Prithvi Shaw IPL 2022 : पृथ्वी शॉ मैदानावर कधी कमबॅक करणार?; मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी दिले धक्कादायक अपडेट्स

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष सुरू असताना त्यांचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याच्यावर  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तापाने फणफणल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. त्यामुळे तो सलग तिसऱ्या सामन्याला मुकला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रिषभ पंत याने पृथ्वीच्या प्रकृतीबाबत काहीच अपडेट्स दिले नाहीत. पण, सामना सुरू असताना मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (  Ricky Ponting ) यांनी फ्रँचायझीचं टेंशन वाढवणारी माहिती दिली.

पृथ्वीने यंदाच्या आयपीएलमध्ये ९ सामन्यांत २८.७८च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत. पृथ्वीने काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतानाचा फोटो पोस्ट करून लवकर कमबॅक करेन अशी पोस्ट लिहिली. पण, रिकी पाँटिंगच्या आजच्या विधानानुसार पृथ्वी उर्वरित सामन्यांत खेळण्याची शक्यता कमीच आहे. राजस्थानची फलंदाजी सुरू असताना समालोचकांनी पाँटिंगला पृथ्वीबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी पृथ्वीने आयपीएल २०२२मधून माघार घेतल्याचे सांगितले.  

दिल्ली कॅपिटल्स - ११ सामने, १० गुण
उर्वरित लढती - राजस्थान रॉयल्स ( ११ मे), पंजाब किंग्स ( १६ मे) व मुंबई इंडियन्स ( २१ मे); RCBचा एक पराभव अन् दिल्ली कॅपिटल्सच्या आशा पल्लवीत होतील. दिल्लीने तीनही लढत जिंकल्या तर त्यांचे १६ गुण होतील. त्यांचा नेट रन रेट हा + ०.१५० असा आहे. पण, जर राजस्थान व बंगळुरू यांचे दोघांचेही १८ गुण झाल्यास दिल्लीचा पत्ता कट होईल.

Web Title: DC head coach Ricky Ponting did reveal that the young opener Prithvi Shaw had been ruled out of IPL 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.