जडेजा आयपीएलमधून ‘बाद’; बंगळुरूविरुद्ध झाली होती दुखापत

चेन्नईचे तीन सामने शिल्लक असून,  त्यांचे आठ गुण आहेत. सर्व तिन्ही सामने जिंकल्यास त्यांचे १४ गुण होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 05:56 AM2022-05-12T05:56:22+5:302022-05-12T05:56:36+5:30

whatsapp join usJoin us
Csk Ravindra Jadeja exit from IPL; The injury was against Bangalore | जडेजा आयपीएलमधून ‘बाद’; बंगळुरूविरुद्ध झाली होती दुखापत

जडेजा आयपीएलमधून ‘बाद’; बंगळुरूविरुद्ध झाली होती दुखापत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बंगळुरूविरुद्ध जखमी झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार अष्टपैलू आणि माजी कर्णधार रवींद्र जडेजा आयपीएलमधून बाहेर झाला आहे. प्ले ऑफसाठी संघर्ष करीत असलेल्या सीएसकेसाठी ही वाईट बातमी असून, क्षेत्ररक्षणादरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. यामुळे दिल्लीविरुद्ध तो अंतिम संघाबाहेर बसला होता.

चेन्नईचे तीन सामने शिल्लक असून,  त्यांचे आठ गुण आहेत. सर्व तिन्ही सामने जिंकल्यास त्यांचे १४ गुण होतील.  अन्य संघांच्या निकालावरही त्यांना लक्ष ठेवावे लागेल.  अशावेळी प्ले ऑफसाठी धाव सरासरी मोलाची ठरणार आहे. जडेजाने यंदा आठ सामन्यांत नेतृत्व केल्यानंतर कर्णधारपद सोडले होते. त्याच्या नेतृत्वात सीएसकेला केवळ दोन विजय मिळू शकले.

जडेजा अनफॉलो
सीएसके आणि जडेजा यांच्यामध्ये मतभेद झाल्याच्या चर्चांनी सोशल मीडिया ढवळून निघाले. सीएसके संघाने जडेजाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे काही नेटिझन्सनी समोर आणले. मात्र सीएसकेनेही ट्विट करत आपण अजूनही जडेजाला फॉलो करत असल्याचे सांगितले; परंतु अनेक नेटिझन्सनी सीएसकेची फॉलोअर लिस्ट पडताळून पाहिली, तेव्हा त्यात जडेजा दिसला नाही. 

जडेजासाठी सीएसकेने १६ कोटी मोजले
१० सामन्यांत ११६ धावा, ५ बळी
एक धाव पडली - १३.७९ लाखांत
दहा सामन्यात नेतृत्व, दोन जिंकले

Web Title: Csk Ravindra Jadeja exit from IPL; The injury was against Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.