Captain Rohit Sharma : रोहित शर्माची वन डे संघाच्या कर्णधारपदी निवड होताच व्हायरल झाले १० वर्षांपूर्वीचे ट्विट; त्यानं तेव्हाच ठरवलं होतं... 

रोहित शर्माची ( Rohit Sharma) टीम इंडियाच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावर विराजमान होण्याची घोषणा बुधवारी बीसीसीआयनं केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 03:46 PM2021-12-09T15:46:00+5:302021-12-09T15:47:09+5:30

whatsapp join usJoin us
Captain Rohit Sharma : Rohit Sharma's 10-year-old tweet goes viral moments after his appointment as India's ODI captain | Captain Rohit Sharma : रोहित शर्माची वन डे संघाच्या कर्णधारपदी निवड होताच व्हायरल झाले १० वर्षांपूर्वीचे ट्विट; त्यानं तेव्हाच ठरवलं होतं... 

Captain Rohit Sharma : रोहित शर्माची वन डे संघाच्या कर्णधारपदी निवड होताच व्हायरल झाले १० वर्षांपूर्वीचे ट्विट; त्यानं तेव्हाच ठरवलं होतं... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित शर्माची ( Rohit Sharma) टीम इंडियाच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावर विराजमान होण्याची घोषणा बुधवारी बीसीसीआयनं केली. त्यानंतर रोहितचं १० वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयनं कसोटी संघाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी लगेचच यापुढे रोहित शर्मा हा वन डे संघाचाही कर्णधार असेल असे जाहीर करून सर्वांना धक्का दिला.  

रोहितला २०११च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळालं नव्हतं आणि तोच रोहित आता २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. रोहितनं त्यावेळी केलेलं ट्विट कालपासून पुन्हा व्हायरल झालं आहे. १७ एप्रिल २०१०ला त्यानं एक ट्विट केलं होतं. त्यात त्यानं म्हटलं होतं की,''वर्ल्ड कप संघात मी स्थान डिझर्व्ह करतो का, असा प्रश्न विचारणाऱ्यांना मी माझ्या बॅटीनेच उत्तर देईन.''

पण, २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितला संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यानं ट्विट केलं की,''वर्ल्ड कप संघात स्थान न मिळाल्यानं निराश झालोय. पण मला यातून पुढे चालायला हवं, परंतु खरं सांगायचं तर हा माझ्यासाठी मोठा धक्का आहे.''


रोहितला २०१५च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळालं आणि त्यानं ८ सामन्यांत ३३० धावा कुटल्या. बांगलादेशविरुद्धची १३७ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. त्यानंतर २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं ५ शतकांसह ६४८ धावा चोपल्या. एकाच वर्ल्ड कप स्पर्धेत पाच शतकं करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. 

Web Title: Captain Rohit Sharma : Rohit Sharma's 10-year-old tweet goes viral moments after his appointment as India's ODI captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.