Virat Kohli Will Not Play in Vijay Hazare Trophy 2025 : विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांच्या भविष्यासंदर्भातील मुद्दा सध्या चांगलाच गाजताना दिसतोय. भारतीय वनडे संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण अनुकूल असल्याची चर्चा रंगत असताना त्यात किंग कोहली आणि निवड समितीचा सदस्य प्रज्ञान ओझा यांच्यातील विमानतळावरील गहण चर्चेच्या व्हायरल व्हिडिओची भर पडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय क्रिकेटमध्ये नवा 'तमाशा' अन् नवा 'वग' असा खेळ रंगल्याचे चित्र
टीम इंडियात नेमकं काय सुरु आहे. विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात खरंच मतभेद आहेत का? त्यामागचं कारण काय? बीसीसीआय निवड समितीचा प्रमुख अजित आगरकरची भूमिका काय? असे अनेक प्रश्न आता चर्चेचा विषय ठरत आहेत. यासंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. गंभीर आणि आगरकर यांनी वनडेत टिकून राहण्यासाठी जो प्लॅन तयार केला आहे तो विराटला अजिबात मान्य नाही. त्यामुळेच भारतीय क्रिकेटमध्ये नवा 'तमाशा' अन् नवा 'वग' असा खेळ रंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती.
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
रोहित तयार, पण कोहली न खेळण्यावर ठाम!
फिटनेस आणि फॉर्म कायम असल्याचे सिद्ध करण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे, असा प्लॅन बीसीसीआयनं आखला आहे. २०२४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पराभवानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरसह बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी या मुद्यावर जोर दिला होता. विराट कोहलीसह रोहित शर्मा रणजी सामना खेळतानाही दिसले. आता वनडे संघातील स्थान कायम राखण्यासाठी या जोडीवर देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकदिवसीय प्रारुपात खेळवण्यात येणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळणं बंधनकारक करण्याचा प्लॅन शिजला आहे. रोहित शर्मानं वनडे कारकिर्द टिकवण्यासाठी मुंबईच्या संघाकडून खेळण्याची तयारीही दर्शवली आहे. पण विराट कोहली मात्र या स्पर्धेत खेळण्यास तयार नाही. जे चित्र सध्या निर्माण झाले आहे त्यामागचं हेच प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे.
पहिल्या वनडेतील शतकी खेळीनंतर विराटनंअप्रत्यक्षरित्या मनातली गोष्ट बोलूनही दाखवली
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रांचीच्या मैदानातील वनडे सामन्यात विराट कोहलीनं दमदार शतकी खेळी केली. विक्रमी कामगिरीनंतर तो सामनावीरही ठरला. यावेळी तो म्हणाला होता की, मी अति सरावापेक्षा फिटनेस आणि माइंडफुलनेसवर अधिक भर देतो. त्याच्या या वक्तव्यातच तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार नाही, ही गोष्ट दडली होती. याच मुद्यावरून वातावरण तापल्याचे दिसत आहे. अधिकृतरित्या यासंदर्भात कोणीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे यावर तोडगा कसा निघणार? ते पाहण्याजोगे असेल.