BBL 2021-22 : ६ षटकार, २३ चौकार... RCBनं ज्याला रिलिज केलं त्या फलंदाजानं BBLमध्ये गोलंदाजांना धु धु धुतलं

Big Bash League 2021ला आजपासून सुरूवात झाली आणि पहिल्याच सामन्यात सिडनी सिक्सर्स संघानं ( Sydney Sixers) विक्रमी कामगिरी करून दाखवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 04:53 PM2021-12-05T16:53:31+5:302021-12-05T17:09:40+5:30

whatsapp join usJoin us
BBL 2021-22 : Josh Philippe smashed 83 runs from just 47 balls, Melbourne Stars bowled out for just 61 against Sydney Sixers  | BBL 2021-22 : ६ षटकार, २३ चौकार... RCBनं ज्याला रिलिज केलं त्या फलंदाजानं BBLमध्ये गोलंदाजांना धु धु धुतलं

BBL 2021-22 : ६ षटकार, २३ चौकार... RCBनं ज्याला रिलिज केलं त्या फलंदाजानं BBLमध्ये गोलंदाजांना धु धु धुतलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Big Bash League 2021ला आजपासून सुरूवात झाली आणि पहिल्याच सामन्यात सिडनी सिक्सर्स संघानं ( Sydney Sixers) विक्रमी कामगिरी करून दाखवली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात BBLमधील सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला गेला. सिडनी सिक्सर्कच्या फलंदाजांनी मेलबर्न स्टार्स ( Melbourne Stars) संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. सिडीन मैदानावर घरच्या संघानं २३ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली आणि त्यात चमकला तो RCBनं नुकताच रिलिज केलेला जोश फिलिप ( Josh Philippe).... त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर सिडनी सिक्सर्सनं ४ बाद २१३ धावा कुटल्या.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आतापर्यंत हिट संघानं दोन वर्षांपूर्वी ४ बाद २०९ धावा चोपून सर्वोत्तम खेळीची नोंद केली होती. तो विक्रम आज सिडनी सिक्सर्सनं मोडला. प्रथम फलंदाजी करताना फिलिप, जेम्स विंस व कर्णधार मोईजेस हेन्रिक्स यांची  फटकेबाजी पाहायला मिळाली.  २०२०च्या आयपीएलमध्ये RCBकडून ५ सामन्यांत ७८ धावा करणाऱ्या फिलिपनं ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावा कुटल्या. विंसनं ४४ धावांची खेळी केली. तर हेन्रिक्सनं ३८ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७६ धावा चोपल्या. या तिघांनीच संघाला ४ बाद २१३ हा मोठा पल्ला गाठून दिला.


प्रत्युत्तरात  सिक्सर्सच्या गोलंदाजांनीही कमाल केली. ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मेलबर्न स्टार्स संघाला ६१ धावांत गुंडाळले. पीटर नेव्हिल ( १८) व हिल्टन कार्टराईट ( १०) वगळता मेलबर्न स्टार्सच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. स्टीव ओ'किफीनं १४ धावांत ४, सीन अॅबॉटनं १४ धावांत ३, तर हेडन केरनं ६ धावांत २ विकेट्स घेतल्या. सिडनी सिक्सर्सनं १५२ धावांनी हा सामना जिंकला.

 

आयपीएल २०२२साठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी) यांना रिटेनं करून पर्समधील 57 कोटी रक्कम वाचवली. 

Web Title: BBL 2021-22 : Josh Philippe smashed 83 runs from just 47 balls, Melbourne Stars bowled out for just 61 against Sydney Sixers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.