पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) संदर्भात तिखट प्रतिक्रिया देत PLS क्रिकेट जगतातील नंबर वन लीग स्पर्धा आहे, असे हास्यास्पद वक्तव्य केले आहे. या मुद्यावरून आता सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धेचे गोडवे गाताना नाव न घेता त्याने IPL स्पर्धेवर निशाणा साधला. जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धेवर नाहक टीका करण्याच्या नादात त्याची फजिती झाल्याचे दिसून येते. नेमकं तो काय म्हणाला? त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली कशी उडवली जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकच्या माजी क्रिकेटरनं नाव न घेता IPL स्पर्धेवर साधला निशाणा
एका कार्यक्रमात पाकिस्तानमधील PSL स्पर्धा सर्वोत्तम असल्याचा दावा करताना वसीम अक्रम म्हणाला की काही स्पर्धा या दोन-तीन महिने चालतात. "बच्चे बड़े हो जाते हैं, लेकिन वो लीग खत्म नहीं होती." PSL स्पर्धा ३४-३५ दिवसांत संपते. त्यामुळे परदेशी खेळाडूंसाठीही ही स्पर्धा सोयीचे आहे. अडीच ते तीन महिने चालणारी कोणतीही स्पर्धा कंटाळवाणी असते. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धा सुरुवातीच्या काळात दीड ते दोन महिने चालायची. पण आता ही स्पर्धा ४० दिवसांत संपते. PSL स्पर्धेत क्वांटिटी पेक्षा क्वलिटीला महत्त्व दिले जाते, असे म्हणत त्याने PSL ही प्रतिभावंत खेळाडू घडवण्याच्या बाबतीत नंबर वन स्पर्धा आहे, असे भाष्य केले आहे.
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी PSL सह वसीम अक्रमचीही उडवली खिल्ली
वसीम अक्रम याने थेट IPL चा उल्लेख केला नसला तरी त्याचा रोख हा सातत्याने जगात भारी ठरत असलेल्या IPL स्पर्धेकडेच होता. कारण आयपीएल ही जगातील एकमेव स्पर्धा आहे जी सर्वाधिक काळ चालते. अक्रमच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहते पाकच्या माजी क्रिकेटरला ट्रोल करताना दिसत आहे. पाकिस्तानी PSLची IPL शी तुलना करत उगाच आपली स्पर्धा भारी असल्याचा आव आणत आहेत, अशा आशयाच्या कमेंट सोशल मीडियावर उमटताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने तर लवकरच PSL स्पर्धा बंद पडेल, अशी टोलाही लगावल्याचे दिसते.