ICC Team Of The Tournament : बाबर आजमकडे सोपवण्यात आलं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचं नेतृत्व; भारताच्या एकाही खेळाडूला मिळालं नाही स्थान

ICC team of the tournament in the T20 World Cup 2021 इयान बिशॉप, नॅटाली जेर्मानोस आमइ शेन वॉटसन यांच्यासह पत्रकार लॉरेंन्स बूथ व शाहिद हाश्मी यांनी या स्पर्धेतील अव्वल १२ खेळाडू निवडून संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 02:38 PM2021-11-15T14:38:36+5:302021-11-15T14:39:02+5:30

whatsapp join usJoin us
Babar Azam named as the captain of the ICC team of the tournament in the T20 World Cup 2021, The Upstox Most Valuable Team of the Tournament | ICC Team Of The Tournament : बाबर आजमकडे सोपवण्यात आलं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचं नेतृत्व; भारताच्या एकाही खेळाडूला मिळालं नाही स्थान

ICC Team Of The Tournament : बाबर आजमकडे सोपवण्यात आलं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाचं नेतृत्व; भारताच्या एकाही खेळाडूला मिळालं नाही स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC team of the tournament in the T20 World Cup 2021 ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार संपला... ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवताना पहिलेवहिले ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपद नावावर केले. या स्पर्धेत अनेक थरारक सामने पाहायला मिळाले, तगड्या संघांना पराभवाचा धक्का बसला अन् काही नव्या संघांनी आपल्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले. ४५ सामन्यांच्या थरारानंतर  आयसीसीनं स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची घोषणा सोमवारी केली.  Most Valuabe Team of the Tournament has been selected.

इयान बिशॉप, नॅटाली जेर्मानोस आमइ शेन वॉटसन यांच्यासह पत्रकार लॉरेंन्स बूथ व शाहिद हाश्मी यांनी या स्पर्धेतील अव्वल १२ खेळाडू निवडून संघ जाहीर केला. मोहम्मद रिझवान याला टॉप ऑर्डरमध्ये स्थान मिळालेलं नाही. चतिथ असलंका आणि एडन मार्करामन यांनी मात्र या संघात स्थान पटकावले आहे. मोइन अलीनं  अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान पटकावले. गोलंदाजीमध्ये वनिंदू हसरंगा आणि अॅडम झम्पा यांची निवड केली आहे.  शाहिन शाह आफ्रिदी हा १२ वा खेळाडू म्हणून संघात असणार आहे. पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याच्याकडे  या  संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

  • डेव्हिड वॉर्नर - ४८.१६च्या सरासरीनं २८९ धावा
  • जोस बटलर -   ८९.६६च्या सरासरीनं २६९ धावा
  • बाबर आजम - ६०.६० च्या सरासरीनं ३०३ धावा
  • चरिथ असलंका - ४६.२०च्या सरासरीनं २३१ धावा
  • एडम  मार्कराम -  ५४च्या सरासरीनं १६२ धावा
  • मोईन अली - ९२ धावा आणि ७ विकेट्स
  • वनिंदू हसरंगा - १६ विकेट्स व ११९ धावा
  • अॅडम झम्पा - १३ विकेट्स
  • जोश हेझलवूड - ११ विकेट्स
  • ट्रेंट बोल्ट  - १३ विकेट्स
  • अॅनरीच नॉर्ट्जे - ९ विकेट्स
  • शाहिन आफ्रिदी ( १२ वा खेळाडू ) - ७ विकेट्स.

Web Title: Babar Azam named as the captain of the ICC team of the tournament in the T20 World Cup 2021, The Upstox Most Valuable Team of the Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.