Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ

फिटनेस सिद्ध करताना पांड्याचा हिट शो! मॅच थांबवणाऱ्या चाहत्याला दिली सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:49 IST

Open in App

 Fan Entered Ground To Meet Hardik Pandya During Syed Mushtaq Ali Trophy  : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेआधी हार्दिक पांड्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेतून क्रिकेटमध्ये कमबॅक केले. हैदराबादच्या मैदानात बडोदा विरुद्ध पंजाब यांच्यातील सामना खेळवण्यात आला. या सामन्यातून भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याने क्रिकेटच्या मैदानात धमाकेदार पुनरागमन केले. गोलंदाजी करताना एक विकेट घेतल्यावर धावांचा पाठलाग करताना त्याने मॅच विनिंग खेळी साकारली. त्याच्या धमाकेदार खेळीशिवाय हार्दिक पांड्याच्या भेटीसाठी चाहत्यानं सुरक्षा कवच भेदून मैदानात मारलेली एन्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पांड्याचा स्वॅग; Live मॅचमध्ये चाहता थेट मैदानात घुसला अन् हार्दिकसोबत सेल्फी काढून परतला!

Fan Entered Ground To Meet Hardik Pandya During Syed Mushtaq Ali Trophy

पंजाब आणि बडोदा यांच्यातील सामन्यादरम्यान पांड्याची कमालीची क्रेझ पाहायला मिळाली. त्याला भेटण्यासाठी चाहतावर्ग मैदानात घुसल्यामुळे अनेकदा खेळ थांबवण्याची वेळ आली. एका चाहत्यानं तर कहरच केला. त्याने मैदानात घुसून सामना थांबवलाच. पण कमालीची गोष्ट म्हणजे हार्दिक पांड्याने या चाहत्याला आपल्यासोबत सेल्फी काढण्याची परवानगीही दिली. या चाहत्यावर कोणताही कारवाई करु नका, अशा सूचना देखील हार्दिक पांड्याने सुरक्षा रक्षकांना दिल्या आहेत, असा दावाही सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 

IND vs SA: सुरक्षा भेदून विराट कोहलीच्या पायाला स्पर्श केला; 'त्या' चाहत्याला शिक्षा झाली का?

फिटनेस सिद्ध करताना पांड्याचा हिट शो!

आशिया कप २०२५ स्पर्धेत झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या टीम इंडियाबाहेर होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात त्याने फिटनेस सिद्ध करत हिट शो दाखवला. गोलंदाजीत एक विकेट आपल्या खात्यात जमा केल्यावर त्याने नाबाद अर्धशतकी खेळीसह संघाला विजय मिळवून देत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी शड्डू ठोकला आहे. हैदराबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात  अभिषेक शर्मा आणि अनमोलप्रित सिंग यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाबच्या संघाने बडोदा संघासमोर २२३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने ४२ चेंडूत ७७ धावांची नाबाद खेळी करत संघाला ५ चेंडू आणि ७ गडी राखून विजय मिळवून दिला. या खेळी पांड्याच्या भात्यातून ७ चौकार आणि ४ षटकार पाहायला मिळाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fan invades cricket field, Hardik Pandya poses for selfie!

Web Summary : During a match, a fan breached security to meet Hardik Pandya. Pandya obliged with a selfie, even requesting no action against the fan. After injury, Pandya showcased fitness with a match-winning performance, scoring an unbeaten 77, signaling readiness for the South Africa series.
टॅग्स :हार्दिक पांड्याअभिषेक शर्माबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघदक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाटी-20 क्रिकेट