New logo on Team India jersey; 'Oppo' out of half of it contract canceled | टीम इंडियाच्या जर्सीवर नवा लोगो; 'ओप्पो' अर्ध्यातूनच 'आउट'
टीम इंडियाच्या जर्सीवर नवा लोगो; 'ओप्पो' अर्ध्यातूनच 'आउट'

मुंबई: गेल्या दोन वर्षापासून भारतीय संघाच्या जर्सीवर ओप्पो या चिनी कंपनीचा लोगो असायाचा. मात्र आता हे बदलून BYJU'S या भारतीय कंपनीचा लोगो जर्सीवर झळकणार असून भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यात धर्मशाला येथे आज रंगणाऱ्या पहिल्या ट्वेंटी- 20 सामन्यात टीम इंडिया नव्या स्पॉन्सरच्या जर्सीत उतरणार आहे.
 
गेल्या दोन वर्षापासून भारतीय संघाच्या जर्सीवर ओप्पो या चिनी कंपनीचा लोगो असायाचा. मात्र हे बदलून आता बायजू या भारतीय कंपनीचे नाव जर्सीवर झळकणार आहे. याबाबत ओप्पो कंपनीने याबाबत सांगितले की, या हक्कांसाठी गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च केले असे वाटल्याने कंपनीने करार अर्धवट सोडल्याचे सांगितले. मात्र बीसीसीआयला याचे कोणतेही नुकसान होणार नसून हक्कांसंबंधातील उर्वरित रक्कम आता बायजू कंपनी कडून घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

तसेच ओप्पो या चिनी कंपनीला पाच वर्षांसाठी 1079 कोटी रुपयांच्या मोबदल्यात मार्च 2017 मध्ये हक्क मिळाले होते. परंतु कंपनीने अडीच वर्षे आधीच हक्क सोडण्याचे ठरविले आहे. बीसीसीआयने यासाठी कोणत्याही लिलाव प्रक्रियेची सुरूवात केली नाही. परंतु ओप्पोने स्वत:च हे अधिकार बायजू या भारतीय कंपनीला दिला आहे.

 

Web Title: New logo on Team India jersey; 'Oppo' out of half of it contract canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.