हार्दिक पांड्याच्या पत्नीचं दुबईत वॉटर रायडिंग; इशान किशन, श्रेयस अय्यरही होते सोबत, पाहा Video

Hardik Pandya ची पत्नी नताशानं आपल्या Instagram अकाऊंटवरून शेअर केला व्हिडीओ.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 09:18 PM2021-11-10T21:18:33+5:302021-11-10T21:21:26+5:30

whatsapp join usJoin us
natasha stankovic hot photos videos viral on social media hardik pandya wife with shreyas iyer ishan kishan | हार्दिक पांड्याच्या पत्नीचं दुबईत वॉटर रायडिंग; इशान किशन, श्रेयस अय्यरही होते सोबत, पाहा Video

हार्दिक पांड्याच्या पत्नीचं दुबईत वॉटर रायडिंग; इशान किशन, श्रेयस अय्यरही होते सोबत, पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सध्या दुबई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या टी २० (T20 World Cup) विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारतीय संघावर सेमीफायनलपूर्वीच स्पर्धेतून बाहेर जाण्याची नामुष्की ओढावली. विकेटकिपर फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना न्यूझीलंडविरोधातील  (IND vs NZ T20 Series) टी २० मालिकेच्या संघातील १६ जणांमध्ये स्थान देण्यात आलं आहे. इशान किशन हा टी २० स्पर्धेत संघाचा भाग होता, तर श्रेयस रिझर्व्ह खेळाडूंमध्ये होता. 

भारतीय संघ न्यूझीलंड विरोधात १७ नोव्हेंबपासून ३ सामन्यांची टी २० सीरिज खेळणार आहे. दरम्यान, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मात्र संघात स्थान देण्यात आलेलं नाही. गेल्या काही काळापासून त्याला फिटनेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.


हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकनं (Natasa Stankovic) बुधवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये समुद्रात बोटिंगचा आनंद लुटताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिच्यासोबत इशान किशन आणि श्रेयर अय्यर हेदेखील बोटिंग करताना दिसत आहेत. नताशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तर अनेकदा ती स्वत:चे आणि हार्दिकसोबत मुलगा अगस्त्यचे फोटो आणि व्हिडीओही शेअर करत असते. दरम्यान, आगामी न्यूझीलंड विरोधातील मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या हाती सोपवण्यात आली आहे. तर विराट कोहली संघात नसेल. या टीममध्ये अनेक तरूण खेळाडूंना स्थान देण्यात आलं असून काही अनुभवी खेळाडूंचंही पुनरागमन होणार आहे.

Web Title: natasha stankovic hot photos videos viral on social media hardik pandya wife with shreyas iyer ishan kishan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.