Prithvi Shaw : ७ सामन्यांत ४ शतकं अन् अनेक विक्रम; सचिन तेंडुलकरच्या 'गुरूमंत्रा'नं पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला कलाटणी

'My mind was messed up': Prithvi Shaw ७ सामन्यांत ७५४ धावा, १ द्विशतक व ३ शतकं. १८८.५ ची सरासरी व १३४.८८चा स्ट्राईक रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 04:29 PM2021-03-12T16:29:05+5:302021-03-12T16:29:38+5:30

whatsapp join usJoin us
'My mind was messed up': Shaw reveals the advice he got from Sachin Tendulkar after disappointing tour of Australia | Prithvi Shaw : ७ सामन्यांत ४ शतकं अन् अनेक विक्रम; सचिन तेंडुलकरच्या 'गुरूमंत्रा'नं पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला कलाटणी

Prithvi Shaw : ७ सामन्यांत ४ शतकं अन् अनेक विक्रम; सचिन तेंडुलकरच्या 'गुरूमंत्रा'नं पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला कलाटणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) भन्नाट फॉर्मात आहे. विजय हजारे ट्रॉफीत  एका पर्वात सर्वाधिक ७५४ धावा, नाबाद २२७ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी अन् विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांचाही विक्रम पृथ्वीनं यंदाच्या स्पर्धेत मोडला. त्यानं ७ सामन्यांत एका द्विशतकासह चार शतकी खेळी केली. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हाच पृथ्वी पूर्णपणे अपयशी ठरला होता. अचानक तो धावांचा पाऊस कसा पाडू लागला, याला महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचा गुरूमंत्र कारणीभूत आहे. ( advice got from Sachin Tendulkar ) रोहित शर्मासोबत आज सलामीला कोण उतरणार?; विराट कोहलीचा खास मित्राला पाठिंबा

Indian Express शी बोलताना पृथ्वी म्हणाला, ''जेव्हा मला सर्वांनी नाकारले, तेव्हा मी स्वतःवरील विश्वास कमी होऊ दिला नाही. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी मी कुठे चुकतोय, हे समजावून सांगितले. मला त्या चुकांवर तोडगा नेट्समध्ये शोधायचा होता. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर मी सचिन सरांना भेटलो. फलंदाजीच्या शैलीत फार काही बदल करू नकोस, फक्त बॉल शरिराजवळून खेळ, असं त्यांनी मला सांगितलं. '' Prithvi Shaw had a miserable 2020 with the bat 

तो म्हणाला,''पहिल्या कसोटीतील अपयशानंतर मला संघातून वगळण्यात आले आणि मी प्रचंड तणावाखाली गेलो. मी आता काहीच करू शकत नाही, असे मला वाटू लागले. पण, आता धावा केल्यानंतर मला आनंद झाला आहे. काही झालं तरी खचायचं नाही, हे मी स्वतःशी ठरवले होते.'' 


विजय हजारे ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज 
७५४* - पृथ्वी शॉ, २०२१
७२३ - मयांक अग्रवाल, २०१८
६७२ - देवदत्त पडीक्कल, २०२१ ( आतापर्यंत)
६०९ - देवदत्त पडीक्कल, २०१९
६०७ - दिनेश कार्तिक, २०१७
६०५ - रविकुमार समर्थ, २०२१ ( आतापर्यंत) 

पृथ्वी शॉची यंदाच्या पर्वातील कामगिरी ( Prithvi Shaw in Vijay Hazare 2021)
१०५*( ८९) वि. दिल्ली 
३४ ( ३८) वि. महाराष्ट्र
२२७* ( १५२) वि. पुद्दुचेरी
३६ ( ३०) वि. राजस्थान
२ ( ५) वि. हिमाचल प्रदेश
१८५* ( १२३) वि. सौराष्ट्र ( उपांत्यपूर्व फेरी)
१६५ ( १२२) वि. कर्नाटक ( उपांत्य फेरी)  
७ सामन्यांत ७५४ धावा, १ द्विशतक व ३ शतकं. १८८.५ ची सरासरी व १३४.८८चा स्ट्राईक रेट

Web Title: 'My mind was messed up': Shaw reveals the advice he got from Sachin Tendulkar after disappointing tour of Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.