मुंबईकरांचा विजयी ‘चौकार’

बलाढ्य मुंबई संघाने सलग चौथा विजय मिळवत मुश्ताक अली राष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धेत आपली अपराजित मालिका कायम राखली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 03:59 AM2019-11-13T03:59:15+5:302019-11-13T04:00:07+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai's victorious 'foursome' | मुंबईकरांचा विजयी ‘चौकार’

मुंबईकरांचा विजयी ‘चौकार’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : बलाढ्य मुंबई संघाने सलग चौथा विजय मिळवत मुश्ताक अली राष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धेत आपली अपराजित मालिका कायम राखली आहे. मंगळवारी घरच्या मैदानावर खेळताना मुंबईने पाँडेचेरी संघाचा २७ धावांनी पराभव केला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर मुंबईकरांनी प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७१ धावांची मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाँडेचेरीला २० षटकांत ७ बाद १४४ इतक्याच धावा करता आल्या. शाम्स मुलानी आणि तुषार देशपांडे यांनी टिच्चून मारा करताना २ बळी घेत पाँडेचेरीची कोंडी केली. शार्दुल ठाकूर, आतिफ अत्तरवाला आणि शिवम् दुबे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पाँडेचेरीकडून पारस डोग्राने ३५ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा केल्या. ए. अरविंदाराज याने ३१ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह ३९ धावा फटकावल्या. मुंबईकरांच्या नियंत्रित माऱ्यापुढे पाँडेचेरीला फटकेबाजी करण्यात अपयश आले.
तत्पूर्वी, मुंबईकरांनी आक्रमक सुरुवात केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावताना ३७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा चोपल्या. सिद्धेश लाड यानेही त्याला चांगली साथ देताना २२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. दोघांनी चौथ्या गड्यासाठी ६५ धावांची वेगवान भागीदारी करत मुंबईला सुस्थितीत आणले. सागर त्रिवेदीने ४ बळी घेत मुंबईला अडचणीत आणण्याचा चांगला प्रयत्न केला.

Web Title: Mumbai's victorious 'foursome'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.