मुंबई इंडियन्सपुढे चेन्नईचे तगडे आव्हान; संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा

सायंकाळी ७.३० वाजल्यापासून हा सामना शेख जायेद स्टेडियममध्ये सुरु होईल. मुंबईने सर्वाधिक चार, तर चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 07:43 AM2020-09-19T07:43:13+5:302020-09-19T07:44:01+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians face Chennai's tough challenge; Enthusiastic Rohit's leadership test against Samyami Dhoni | मुंबई इंडियन्सपुढे चेन्नईचे तगडे आव्हान; संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा

मुंबई इंडियन्सपुढे चेन्नईचे तगडे आव्हान; संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबूधाबी: आयपीएलच्या १३ व्या पर्वात सलामीला सर्वात यशस्वी असलेले रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि संयमी महेद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज हे दोन संघ आज शनिवारी पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध झुंज देणार आहेत. पहिल्याच ‘हायव्होल्टेज’ लढतीत कोण बाजी मारणार हे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सायंकाळी ७.३० वाजल्यापासून हा सामना शेख जायेद स्टेडियममध्ये सुरु होईल. मुंबईने सर्वाधिक चार, तर चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. दोन्ही संघ गेल्या वर्षी फायनलमध्ये लढले होते. आता दोन्ही संघ पुन्हा विजयासाठी मैदानात उतरतील.
मुंबई इंडियन्सचा संघ विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल तर चेन्नईचा संघ मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघाने नेहमी प्लेआॅफमध्ये प्रवेश केला. ते या स्पर्धेचे पाच वेळा उपविजेते ठरले आहेत. त्यानंतर २०१८ साली शानदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले होते.

वेदर रिपोर्ट । येथे तापमान ३७ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. यामुळे भीषण गर्मी आणि उकाडा असेल. आकाश निरभ्र राहणार असल्याने पावसाची शक्यता नाही.

पीच रिपोर्ट । येथे खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक मानली जात आहे. तसेच फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता. मैदान फार मोठे असल्यामुळे फलंदाज फिरकीविरुद्ध धोका पत्करणार नाहीत. मध्यम वेगवान मारा उपयुक्त ठरू शकतो. मोठी फटकेबाजी टाळून एक किंवा दोन धावांवर अधिक भर द्यावा लागेल.

मजबूत बाजू
चेन्नई । महेंद्रसिंग धोनीचे अनुभवी तसेच संयमी नेतृत्व. ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा यांच्यासारख्या ‘मॅचविनर’चा संघात भरणा.
मुंबई । कर्णधार रोहित आणि कीरोन पोलार्ड यांची भक्कम फलंदाजी. हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंची उपस्थिती.

कमजोर बाजू
चेन्नई । सुरेश रैना आणि हरभजनसिंग यांनी घेतलेली माघार. दीपक चाहर याचा अपवाद वगळता एकही चांगला वेगवान गोलंदाज संघात नसणे.
मुंबई । लसिथ मलिंगासारख्या अनुभवी गोलंदाजाची अनुपस्थिती. फिरकी गोलंदाजीत उत्कृष्ट गोलंदाजाची उणीव.

Web Title: Mumbai Indians face Chennai's tough challenge; Enthusiastic Rohit's leadership test against Samyami Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.