Mumbai Indians 10th position IPL 2022 : काय ही वेळ आली?; मुंबई इंडियन्सला १०वे स्थान टाळण्यासाठी करावी लागतेय आकडेमोड, पाहा समीकरण! 

Mumbai Indians can avoid the 10th position if: इंडियन प्रीमिअर लीग २०२२चे ६५ सामने झाले तरी अद्याप एकच संघ प्ले ऑफचे तिकीट पटकावू शकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:39 PM2022-05-18T16:39:33+5:302022-05-18T16:40:21+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians can avoid the 10th position if: RR beats CSK by more than 50 runs/chase target around 14-15 overs and MI beats Delhi by more than 50 runs/chase target around 14-15 overs | Mumbai Indians 10th position IPL 2022 : काय ही वेळ आली?; मुंबई इंडियन्सला १०वे स्थान टाळण्यासाठी करावी लागतेय आकडेमोड, पाहा समीकरण! 

Mumbai Indians 10th position IPL 2022 : काय ही वेळ आली?; मुंबई इंडियन्सला १०वे स्थान टाळण्यासाठी करावी लागतेय आकडेमोड, पाहा समीकरण! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai Indians can avoid the 10th position if: इंडियन प्रीमिअर लीग २०२२चे ६५ सामने झाले तरी अद्याप एकच संघ प्ले ऑफचे तिकीट पटकावू शकला आहे. गुजरात टायटन्सने २० गुणांसह प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. त्यापाठोपाठ लखनौ सुपर जायंट्स व राजस्थान रॉयल्स प्रत्येकी १६ गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या खात्यात प्रत्येकी १४, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्या खात्यात प्रत्येकी १२ गुण आहेत. जर तरच्या समीकरणावर प्ले ऑफचं गणित आला अवलंबून आहेत. अशात पाचवेळ आयपीएल जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चारवेळा चषक उंचावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्समध्ये तळावर कोण राहणार, याची चढाओढ रंगताना दिसतेय.


मुंबई इंडियन्सला मंगळवारी झालेल्या सामन्यात SRH कडून ३ धावांनी पराभव पत्करावा लागला. हैदराबादच्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना MI ला १९० धावाच करता आल्या. या पराभवामुळे मुंबईची गाडी १०व्या क्रमांकावर घसरली. मुंबईने १३ सामन्यांत केवळ तीन विजय मिळवले आहेत आणि त्यांच्या खात्यात ६ गुण आहेत. आयपीएलच्या इतिहासात १० सामने गमावणारा मुंबई हा पहिलाच संघ ठरला आहे. त्यात आता १०वे स्थान पटकावून आणखी नामुष्की टाळायची असेल तर मुंबईला मोठी आकडेमोड करावी लागणार आहे. तत्पूर्वी आपण अन्य संघांचे प्ले ऑफ गणित समजून घेऊया... लखनौ व राजस्थान यांचे स्थान जवळपास पक्के आहे. आता एका जागेसाठी चुरस रंगलीय

कोलकाता नाईट रायडर्सचे समीकरण ( KKR's Playoff scenario ) 
- कोलकाता नाईट रायडर्सला लखनौ सुपर जायंट्सवर X धावा राखून विजय मिळवावा लागेल
- गुजरात टायटन्सकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव गरजेचा आहे
- मुंबई इंडियन्सने अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर Y धावा राखून विजय मिळवणे गरजेचा
  
सनरायझर्स हैदराबादसाठीचे गणित ( SRH's Playoff scenario) 
-  लखनौ सुपर जायंट्सकडून KKR ची हार
-  गुजरात टायटन्सकडून RCB चा पराभव
- मुंबई इंडियन्सकडून DCचा किमान ७५ धावांनी पराभव
- सनरायझर्स हैदराबादचा PBKS वर किमान ७५ धावांनी विजय
- मुंबईने १०० धावांनी विजय मिळवला, तर SRHला किमान ५० धावांनी विजय मिळवावा लागेल
- कोलकाताने आजच्या लढतीत लखनौला पराभूत केल्यास SRHचे आव्हान संपुष्टात येईल

पंजाब किंग्सचे गणित ( Punjab Kings Playoff scenario)
- लखनौकडून KKRचा पराभव
- गुजरातकडून RCBचा पराभव
- मुंबईकडून DCचा पराभव
- हैदराबादवर विजय
 
मुंबई इंडियन्सला १०वे स्थान टाळण्यासाठी काय करावं लागेल?
- राजस्थान रॉयल्सने ५०+ धावा राखून किंवा १४-१५ षटकांत लक्ष्य पार करून चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवणे
- मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सवर ५०+ धावा राखून किंवा १४-१५ षटकांत लक्ष्य पार करून विजय मिळवावा लागेल
- यापैकी एकही समिकरण चुकल्यास मुंबई इंडियन्सचे १० वे स्थान पक्के आहे. 

Web Title: Mumbai Indians can avoid the 10th position if: RR beats CSK by more than 50 runs/chase target around 14-15 overs and MI beats Delhi by more than 50 runs/chase target around 14-15 overs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.