विराट कोहलीला ट्रोल करणाऱ्या पोस्टला सूर्यकुमार यादवनं केलं Likes; स्क्रीनशॉट व्हायरल!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाविरुद्ध त्यानं ७९ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याच्या खेळीचं सर्वांनी कौतुक केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: November 17, 2020 11:34 AM2020-11-17T11:34:46+5:302020-11-17T11:35:09+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians batsman Suryakumar Yadav likes controversial tweet trolling Virat Kohli, unlikes it later | विराट कोहलीला ट्रोल करणाऱ्या पोस्टला सूर्यकुमार यादवनं केलं Likes; स्क्रीनशॉट व्हायरल!

विराट कोहलीला ट्रोल करणाऱ्या पोस्टला सूर्यकुमार यादवनं केलं Likes; स्क्रीनशॉट व्हायरल!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हे नाव अधिक चर्चिले गेले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेसाठीच्या संघात सूर्यकुमारला स्थान न मिळाल्यानं BCCIच्या नावानं शिमगा साजरा झाला. मुंबई इंडियान्सच्या ( Mumbai Indians) या खेळाडूनं सातत्यपूर्ण कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले. तरीही त्याला संघात स्थान न दिल्यानं क्रिकेट चाहत्यांनी नाराजी प्रकट केली. त्याचवेळी सूर्यानेही एका सामन्यानंतर मॅच विनिंग खेळल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन सर्वांच्या चांगलेच लक्षात राहण्यासारखे होते. त्याची ती कृती म्हणजे निवड समितीला शाल जोडीचा मारा असल्याची चर्चा रंगली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाविरुद्ध त्यानं ७९ धावांची तुफानी खेळी केली होती. त्याच्या खेळीचं सर्वांनी कौतुक केलं. या सामन्यात विराटनं त्याच्याशी स्लेजिंग केली होती. फलंदाजी करणाऱ्या सूर्याला विराट डोळे वटारून पाहताना सर्वांनी पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी त्याचीच चर्चा रंगली. आता सूर्यकुमारनं सोशल मीडियावर विराटला ट्रोल करणाऱ्या पोस्टला लाईक करून नवीन चर्चेला वाचा फोडली आहे. पण, सूर्यानं लगेच ती पोस्ट अनलाईकही केली. या पोस्टमध्ये क्रिकेट चाहत्यानं विराटला 'पेपर कॅप्टन' ( कागदावरील कर्णधार) असे संबोधले होते. सूर्यानं लाईक्स केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. सूर्यकुमार यादव 'त्या' मुलीचे नृत्य पाहून झाला क्लिन बोल्ड अन् सुरू झाली Love Story!


सूर्यकुमारनं यंदाच्या आयपीएलमध्ये १६ सामन्यांत ४८० धावा केल्या आहेत. आयपीएलच्या मागील तीन पर्वात त्यानं ५१२ ( १४ सामने, २०१८) आणि ४२४ ( १६ सामने, २०१९) धावा केल्या आहेत. यंदाही त्यानं सलग तिसऱ्यांदा ४००+धावा केल्या आणि तरीही त्याला टीम इंडियात पदार्पणाची संधी न मिळाल्यानं निवड समिती व विराट कोहलीवर टीका झाली.


 
सूर्यकुमार यादव हा भारताचा एबीडी : हरभजन सिंग
सूर्यकुमारला संघात स्थान का देण्यात आले नाही,असा प्रश्न हरभजनने ट्विट करीत उपस्थित केला. तो म्हणाला,‘मुंबईला मॅचविनरप्रमाणे एकापाठोपाठ एक विजय मिळवून देण्यात सूर्यकुमारची भूमिका मोलाची ठरली यात शंका नाही.त्याने फलंदाजीची पूर्ण जाबाबदारी स्वीकारली होती. पहिल्या चेंडूपासून तो तुटून पडायचा.त्याला रोखणे कुणाच्याही अवाक्यात नव्हते.त्याच्या तंत्रात सर्व प्रकारचे फटके आहेत. कधी कव्हर्सच्या वरुन तर कधी स्वीपचा फटका मारण्यात त्याचा हातखंडा पाहून तो भारताचा डिव्हिलियर्स असल्याची खात्री पटते.’ सूर्यकुमार यादव भारतीय संघात नसल्याचे पोलार्डलाही आश्चर्य

 

 

Web Title: Mumbai Indians batsman Suryakumar Yadav likes controversial tweet trolling Virat Kohli, unlikes it later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.