IPL 2020 : विश्रांतीचा कालावधी संपला; हार्दिक पांड्या कसून तयारीला लागला

IPL 2020 : सप्टेंबर 2019पासून क्रिकेटपासून दूर असलेला पांड्या मैदानावर तुफान फटकेबाजी करण्यासाठी होतोय सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:34 PM2020-08-12T16:34:10+5:302020-08-12T16:34:34+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians All-Rounder Hardik Pandya Continues to Sweat It Out in Gym Ahead of IPL 2020 | IPL 2020 : विश्रांतीचा कालावधी संपला; हार्दिक पांड्या कसून तयारीला लागला

IPL 2020 : विश्रांतीचा कालावधी संपला; हार्दिक पांड्या कसून तयारीला लागला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुखापत, लॉकडाऊन यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच कालावधी दूर राहिलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं इंडियन प्रीमिअर लीगसाठी ( आयपीएल) जोरदार तयारी केली आहे. सप्टेंबर 2019पासून पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मार्च 2020मध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली होती, परंतु कोरोना व्हायरसमुळे ती मालिका रद्द झाली. त्यानंतर लॉकडाऊन झाल्यामुळे पांड्या घरीच आहे. पण, आता तो आयपीएलमध्ये तुफान फटकेबाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. बुधवारी त्यानं सोशल मीडियावर कसरतीचा व्हिडीओ पोस्ट केला. 

वेदनादायी: कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू झाला अन् धक्क्यानं तासाभरात मुलीनंही जीव सोडला

वन डे वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या ट्वेंटी-20 मालिकेत खेळला. त्यानंतर दुखापतीमुळे तो मैदानापासून बाहेरच आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धा डी. वाय पाटील ट्वेंटी-20 लीगमध्ये फटकेबाजी करून त्यानं पुनरागमनाचे संकेत दिले. पण, त्याच्या पुनरागमनाची मालिका कोरोनामुळे रद्द झाली. दरम्यानच्या काळात हार्दिकनं प्रेयसी नताशा स्टँकोव्हिचसह साखरपुडा केला, ती प्रेग्नंट असल्याची बातमी कळताच कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नही केलं आणि त्यानंतर त्याच्या घरी लहान बाळही जन्माला आला. कौटुंबीक जबाबदारी पार पाडल्यानंतर आता पांड्या पुन्हा मैदानावर पतरण्यासाठी उत्सुक आहे.




अन्य महत्त्वाचे बातम्या

अरे देवा... IPL 2020 सुरू होण्यापूर्वीच माजी विजेत्या संघातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह! 

खतरनाक लँडींग! Video पाहिल्यावर नुसता घामच नाही तर धडकी भरेल

मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल

IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल 

बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR 

अनुष्काने केली प्रश्नांची सरबत्ती; रागीट विराट पत्नीसमोर हरला; Video Viral

 

Web Title: Mumbai Indians All-Rounder Hardik Pandya Continues to Sweat It Out in Gym Ahead of IPL 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.