मोहम्मद शमीचा पाय खोलात; बीसीसीआयवर कारवाई करण्याचे आणले दडपण

वॉरंटनंतर पंधरा दिवसांमध्ये हजर राहण्याचे आदेश शमीला देण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआयने शमीची बाजू घेतली होती. पण बीसीसीआयवर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दडपण आणले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 10:02 PM2019-09-04T22:02:50+5:302019-09-04T22:03:28+5:30

whatsapp join usJoin us
Mohammed Shami's tension increases; pressure on BCCI for action | मोहम्मद शमीचा पाय खोलात; बीसीसीआयवर कारवाई करण्याचे आणले दडपण

मोहम्मद शमीचा पाय खोलात; बीसीसीआयवर कारवाई करण्याचे आणले दडपण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा पाय खोलात जाण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी शमीविरोधात अटक वॉरेंट काढण्यात आले होते. वॉरंटनंतर पंधरा दिवसांमध्ये हजर राहण्याचे आदेश शमीला देण्यात आले होते. त्यावेळी बीसीसीआयने शमीची बाजू घेतली होती. पण बीसीसीआयवर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दडपण आणले जात आहे.

'मेरा हक फाउंडेशन' नावाची एक संस्था आहे. काही दिवसांपूर्वी शमीची पत्नी हसीन जहाँ ही 'मेरा हक फाउंडेशन'चे अध्यक्ष फरहत नकवी यांच्याकडे मदत मागायला पोहोचली होती. त्यामुळे आता या संस्थेने बीसीसीआयवर दबाण आणण्याचे ठरवले आहे. जर बीसीसीआय शमीवर कारवाई करणार नसेल, तर 'मेरा हक फाउंडेशन' बीसीसीआयविरोधात मोर्चा उघडेल, असे या संस्थेकडून सांगण्यात येत आहे.

शमी यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही. क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमदविरोधात अलिपोर कोर्टाने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. १५ दिवसांचा अवधी त्याला सरेंडर होण्यास वा जामीन मिळविण्यास देण्यात आला आहे. मोहम्मद शमी सध्या वेस्ट इंडिजविरोधात दुसरी आणि अंतिम कसोटी खेळत आहे. शमीने २०१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. अलीकडेच २०१८ मध्ये मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा भा. दं. वि. कलम ४९८ - अ अन्वये गुन्हा दाखल केला होता. 

जहाँने पश्चिम बंगालच्या अलिपोर कोर्टात शमी आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. या नव्या केसमध्ये हसीन जहाँने शमीवर भत्ता आणि उपचाराचा खर्च न दिल्याचा आरोप केला. हसीन जहाँच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीनने मोहम्मद शमी, त्याची आई, मोठा भाऊ आणि वहिनीविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली. तसेच हसीन जहाँने दर महिन्याला १० लाख रुपये भत्त्याची मागणी केली होती. हसीनने ७ लाख रुपये कुटुंबाचा मेंटेनन्स आणि ३ लाख रुपये मुलीसाठी अशी १० लाखांची मागणी केली होती. केस दाखल केल्यानंतर हसीनने कोर्टात सादर झाला नसल्याचा आरोप केला. एप्रिल २०१९ मध्ये पतीच्या घरी जाऊन गोधळ घातल्याप्रकरणी हसीनला उत्तर प्रदेशातील अमरोही येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली होती.

शमीच्या अटक वॉरंटवर बीसीसीआयने म्हटले आहे की, " जोपर्यंत आम्ही आरोपपत्र पाहत नाही तोपर्यंत आम्ही शमीला अटक करू देणार नाही. आरोपपत्र पाहिल्यावर आम्ही योग्य निर्णय घेऊ."

Web Title: Mohammed Shami's tension increases; pressure on BCCI for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.