बाबर आझमनंतर आणखी एका पाक फलंदाजाचा पराक्रम; ICC क्रमवारीत रोहित, मॉर्गनला टाकलं मागे, Top 10 मध्ये समावेश

ICC T20 Ranking: पाकिस्तान संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याचा आयसीसीच्या (ICC) टी-२० क्रिकेटच्या टॉप-१० फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 04:37 PM2021-04-28T16:37:54+5:302021-04-28T16:42:03+5:30

whatsapp join usJoin us
Mohammed Rizwan in top 10 of ICC Mens T20I Player Rankings | बाबर आझमनंतर आणखी एका पाक फलंदाजाचा पराक्रम; ICC क्रमवारीत रोहित, मॉर्गनला टाकलं मागे, Top 10 मध्ये समावेश

बाबर आझमनंतर आणखी एका पाक फलंदाजाचा पराक्रम; ICC क्रमवारीत रोहित, मॉर्गनला टाकलं मागे, Top 10 मध्ये समावेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 Ranking: पाकिस्तान संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याचा आयसीसीच्या (ICC) टी-२० क्रिकेटच्या टॉप-१० फलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. झिम्बाब्वे विरुद्धची टी-२० मालिका पाकिस्ताननं २-१ ने जिंकली आहे. या मालिकेत मोहम्मद रिझवाननं लक्षवेधी कामगिरी केली. याच पार्श्वभूमीवर मोहम्मद रिझवान यानं क्रमवारीत झेप घेतली आहे. (Mohammed Rizwan in top 10 of ICC Mens T20I Player Rankings)

"पैसा बोलता है"; IPLमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या सहभागावर दिग्गज माजी खेळाडूचं विधान

२८ वर्षीय रिझवान यानं झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात नाबाद ८२ तर तिसऱ्या सामन्यात नाबाद ९१ धावांची तडफदार खेळी साकारली. याच कामगिरीच्या जोरावर रिझवानला आयसीसीच्या क्रमवारीत तब्बल ५ स्थानांची बढत मिळाली आहे. मोहम्मद रिझवान याला आयसीसीच्या टी-२० सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत १० वं स्थान मिळालं आहे. टी-२० सर्वोत्तम फलंदाजांच्या क्रमवारीत समावेश असलेला रिझवान आता दुसरा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 

मोहम्मद रिझवान यानं भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि इंग्लंडचा कर्णधार इऑन मार्गन यांनाही मागे टाकलं आहे. 

आयसीसी टी-२० फलंदाजांची टॉप-१० क्रमवारी पुढीलप्रमाणे:

क्र.खेळाडूसंघगुण
१. डेव्हिड मलानइंग्लंड८९२
२.अरोन फिंचऑस्ट्रेलिया८३०
३. बाबर आझमपाकिस्तान८२८
४.डेवॉन कॉनवेन्यूझीलंड७७४
५. विराट कोहलीभारत७६२
६.रॅसी वॅन दार दुसेनद.आफ्रिका७५६
७.लोकेश राहुलभारत७४३
८.ग्लेन मॅक्सवेलऑस्ट्रेलिया६९४
९.मार्टिन गप्तिलन्यूझीलंड६८८
१०.मोहम्मद रिझवानपाकिस्तान६४०

 

Web Title: Mohammed Rizwan in top 10 of ICC Mens T20I Player Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.