'दहशतवादी देश सोडायचाय!', ट्विटला Like करणं गोलंदाजाला पडलं महागात!

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरनं स्वतःला अडचणीत टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 05:41 PM2019-07-29T17:41:17+5:302019-07-29T17:42:47+5:30

whatsapp join usJoin us
Mohammad Amir in troubled waters after liking controversial tweet calling Pakistan a 'terrorist' country | 'दहशतवादी देश सोडायचाय!', ट्विटला Like करणं गोलंदाजाला पडलं महागात!

'दहशतवादी देश सोडायचाय!', ट्विटला Like करणं गोलंदाजाला पडलं महागात!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लाहोर : पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरनं स्वतःला अडचणीत टाकले आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे, असा संदेश देणाऱ्या एका ट्विटला आमीरनं LIKE केल्यानं त्याच्यावर टीका होत आहे. आमीरनं नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि त्यानं इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याच्या दृष्टीनं ब्रिटीश पासपोर्टसाठीही अर्ज केला आहे.


नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. पण, पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीरने ही स्पर्धा गाजवली. त्यानं 8 सामन्यांत 17 विकेट्स घेत आपला दबदबा दाखवून दिला. पण, संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आमीरनं कसोटीतून निवृत्ती घेतली. 27 वर्षीय आमीर म्हणाला,''पाकिस्तानच्या कसोटी संघाचा सदस्य होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. पण, क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता मला मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.''

त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर पाकिस्तानचे माजी दिग्गज वासीम अक्रम आणि शोएब अख्तर यांनी आश्चर्य व्यक्त केले. शिवाय त्याच्या ब्रिटीश पासपोर्टसाठी केलेल्या अर्जावरही टीका होत आहे. त्याच्या याच ट्विटवर एका चाहत्यानं आमीरला दहशतवाद्यांचा देश सोडायचा असेल, अशी प्रतिक्रीया दिली. त्याला आमीरनेही लाईक केले, परंतु टीका होताच त्यानं चूक सुधारली.
 


4 जुलै 2009 मध्ये आमीरने श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले होते आणि 11 जानेवारी 2019मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो अखेरचा कसोटी सामना खेळला. त्यानं 36 कसोटी सामन्यांत 119 विकेट्स घेतल्या आहेत. 

आमिरने पळ काढला; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची बोचरी टीका
वसीमने म्हणटले की, आमिरच्या निवृत्तीचे मला आश्चर्य वाटते, कारण वयाच्या २७-२८ व्या वर्षीच तुमची खरी परीक्षा असते. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन व इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला आमिरची गरज होती असे त्याने सांगितले. 
त्याचप्रमाणे शोएब अख्तर म्हणाला की, मोहम्मद आमिरने वयाच्या २७ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. मग, हसन अली व वहाब रियाजचं काय असा प्रश्न उपस्थित केला.   
 

Web Title: Mohammad Amir in troubled waters after liking controversial tweet calling Pakistan a 'terrorist' country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.