न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलनने मेजर लीग क्रिकेट २०२५ च्या पहिल्याच सामन्यात मोठा पराक्रम केला. वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध सामन्यात त्याने अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा केल्या, ज्यात पाच चौकार आणि १९ षटकारांचा समावेश आहे. या कामगिरीसह तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावांचा टप्पा गाठणारा पहिलाच खेळाडू ठरला. या खेळीदरम्यान, त्याने वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम मोडला.
टिम सेफर्टसोबत डावाची सुरुवात करताना फिन अॅलेननं सुरुवातीपासूनच प्रहार केला. त्याने पॉवरप्लेमध्ये अवघ्या १४ चेंडूत ४० धावा पूर्ण केल्या, ज्यात पाच षटकाराचा समावेश होता. एमएलसीमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरनच्या नावावर होता. एमएलसीच्या गेल्या हंगामात पूरनने ४० चेंडूत शतक झळकावले. परंतु, फिन अॅलेननं आता हा विक्रमही त्याच्या नावावर नोंदवला. त्याने अवघ्या ३४ चेंडूत शतक पूर्ण केले.
या सामन्यात फिन अॅलनने १९ षटकार मारले. या कामगिरीसह तो टी-२० क्रिकेटमधील एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेल आणि एस्टोनियाच्या साहिल चौहान यांच्या नावावर होता. टी-२० क्रिकेटच्या एका सामन्यात दोघांनीही प्रत्येकी १८-१८ षटकार मारले.
Web Title: MLC 2025: Finn Allen smashes fastest century in league history against Washington Freedom
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.